मुंबई | प्रतिनिधी Mumbai
- Advertisement -
कांदा उत्पादक शेतकरी आणि साखरेच्या प्रश्नावर दिल्लीत बैठकीसाठी गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. फडणवीस यांनी काल, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली होती.
आजच्या भेटीत फडणवीस यांनी राज्यातील विकासाच्या विविध प्रकल्पांबाबत मोदींशी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच त्यांच्या प्रगतीबद्दल पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.




