Monday, November 9, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सायबर गुन्हेगारांचे नवे रॅकेट उघड; टेंडरच्या नावाखाली ४०...

Nashik Crime News : सायबर गुन्हेगारांचे नवे रॅकेट उघड; टेंडरच्या नावाखाली ४० लाखांचा गंडा

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गुजरात राज्य परिवहन महामंडळ (जीएसआरटीसी) आणि मारुती उद्योग कंपनीच्या बसेससाठी सीट फोम पुरवण्याच्या टेंडरचे खोटे आमिष दाखवून, शहरातील एका व्यावसायिकाचे तब्बल ४० लाख ६३ हजार रुपये उकळून फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांनी हायटेक पद्धतीने रचलेल्या या जाळ्यामुळे व्यावसायिक वर्गात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सायबर संशयितांनी १५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत फिर्यादी असलेल्या व्यावसायिकाशी संपर्क साधण्यासाठी ६२९११९९२३६ या मोबाईल क्रमांकाचा आणि gsrtctender831@gmail.com तसेच marutiudyogguj@gmail.com या प्रोफेशनली डिझाइन केलेल्या बनावट ईमेल आयडींचा वापर केला. गुजरात राज्य परिवहन महामंडळ व मारुती उद्योग कंपनीच्या नावाने बोगस कागदपत्रे आणि खोटे लेटरपॅड तयार करून फिर्यादीला दाखविले.

यातून टेंडर खरे असल्याचा विश्वास संपादन केला. दोन्ही कंपन्यांचे टेंडर मंजुर करून देण्याच्या नावाखाली, विविध कारणांचा बहाणा करत अनामत रक्कम, टेस्टिंग फी आणि इतर नानाविध शुल्कांच्या नावाखाली तब्बल ३९ लाख ७३ हजार रुपयांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, प्रत्यक्ष कोणतेही टेंडर किंवा वर्क ऑर्डर हातात न पडल्याने फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले.

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांसमोर गुंतागुंतीचा एक अँगल समोर आला आहे. सायबर चोरट्यांनी (Cyber Theives) लुबाडलेली रक्कम स्वतःच्या खात्यात न घेता, देशभरात पसरलेल्या विविध संशयास्पद आणि सर्वसामान्य नावावरील म्यूल अकाऊंट्समध्ये वळती करून घेतली. या म्यूल खात्यांमुळे पैशांचे मूळ ट्रॅक करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे कठीण असते. मात्र, सायबर पोलिसांच्या पथकाने तत्परता दाखवत ही सर्व संशयास्पद बँक खाती तात्काळ फ्रीज करण्याची आणि खात्यातील शिल्लक रक्कम गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर वपोनि सुशीला कोल्हे यांच्या पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेले मोबाईल नंबर आणि दोन्ही संशयित ईमेल आयडींचे आयपी ॲड्रेस व तांत्रिक विश्लेषणाचे काम सुरू केले आहे.

​पडताळणी आवश्यक

नामांकित कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून शासकीय किंवा निमशासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली होणाऱ्या अशा सायबर फसवणुकीमुळे नाशिकमधील व्यावसायिक व उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, कोणत्याही ऑनलाईन टेंडर प्रक्रियेत कागदपत्रांची खात्रीशीर पडताळणी केल्याशिवाय व्यवहार न करण्याचे आवाहन सायबर पाेलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : ई-मेल धमकीनंतर सप्तशृंगी गडावर ‘हाय अलर्ट’; सुरक्षेत वाढ,...

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungigad ई-मेलद्वारे मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र सप्तशृंगीगडावर (Saptashrungi Gad) पोलीस प्रशासन पूर्णपणे 'अलर्ट मोड'वर आले असून संपूर्ण गड परिसरात कडक...