Sunday, September 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : नाशिक-मालेगावात 'सर्च ऑपरेशन'; मध्यरात्रीच्या छाप्यांनी खळबळ, डिजिटल साहित्य...

Nashik Crime News : नाशिक-मालेगावात ‘सर्च ऑपरेशन’; मध्यरात्रीच्या छाप्यांनी खळबळ, डिजिटल साहित्य आणि रसायने जप्त

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​नाशिक शहर व मालेगाव परिसरात आक्षेपार्ह साहित्य ठेवल्याची गुप्त माहिती दहशतवादी विरोधी पथक व गाेपनीय यंत्रणेला प्राप्त झाल्यानंतर नाशिक पोलिस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे मध्यरात्री धडक शोध मोहीम (सर्च ऑपरेशन) राबवली. न्यायालयाच्या सर्च वॉरंटनुसार राबवलेल्या या कारवाईमुळे नाशिक व मालेगावात (Nashik and Malegaon) खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती कोणतीही थेट बंदी असलेली किंवा आक्षेपार्ह गोष्ट आढळलेली नसली तरी, संशयास्पद एक लॅपटॉप, चार मोबाईल आणि कापड उद्योगात वापरली जाणारी रसायने जप्त केली आहेत.

- Advertisement -

​वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना १२ ऑगस्ट रोजी यासंदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तपास यंत्रणांनी नाशिक न्यायालयाकडून (Nashik Court) शोध वॉरंट मिळवले. १३ ऑगस्टच्या मध्यरात्री दीड वाजता नाशिक शहर व मालेगाव या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापेमारीचे नियोजन करण्यात आले. ​पोलिस उपायुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) व अपर पोलिस अधीक्षक (मालेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शोध पथके तयार करून हे ऑपरेशन राबवण्यात आले. मालेगाव येथील गल्ली नं. ३ मधील टिनाचे शेडमधील कापडाचे गोदाम, ब्लड बँकेजवळील अहले सुन्नत मस्जिद, मदरसा व खानकाह-ए-बरकातिया परिसर व नाशिक शहरातील तीन संशयित व्यक्तींशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली.

झाडाझडती दरम्यान दोन्ही ठिकाणी आक्षेपार्ह किंवा बंदी असलेला साठा पोलिसांना (Police) थेट आढळला नाही. मात्र, मालेगाव येथील एका कापड रंगवण्याच्या ठिकाणी (डाईंग युनिट) हातमागावरील साडी निर्मितीसाठी वापरले जाणारे कॉस्टिक सोडा, नायट्राईट आणि सोडा हे पदार्थ आढळून आले. या साहित्याबाबत कोणतीही शंका शिल्लक राहू नये, म्हणून मालेगाव शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी हे साहित्य जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे (एफएसएल) वैज्ञानिक तपासणीसाठी पाठवले आहे. ​त्याचप्रमाणे, नाशिक शहरातील तीन संशयित व्यक्तींच्या ताब्यातून १ लॅपटॉप आणि ४ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य पुढील तांत्रिक आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

फॉरेन्सिक रिपोर्टवर मदार

जप्त करण्यात आलेले मोबाईल आणि लॅपटॉपमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यासाठी व डिजिटल पुराव्यांच्या तपासणीसाठी ‘डिजिटल फॉरेन्सिक’ टीमची मदत घेतली जात आहे. तसेच जप्त रसायनांचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...