Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमNashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे...

Nashik Crime News : हिरावाडीत गाेळीबाराचा थरार; थेट संशयिताच्या आईवर फायरिंग, चाैघे अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik 

पंचवटी परिसरात (Pachvati Area) शुक्रवारी (दि. १०) रात्री हिरावाडी (Hirawadi) भागात लागोपाठ घडलेल्या दोन घटनांनी शहर हादरले आहे. केवळ तीन तासांच्या अंतराने दोन गटांत झालेल्या टोकाचा संघर्ष आणि त्यानंतर थेट घरात शिरुन महिलेवर झालेल्या गोळीबारामुळे (Shooting) ‘गँगवॉर’ उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. या घटनांमुळे हिरावाडी व तांबोळीनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

शुक्रवारी (दि. १०) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास तांबोळीनगर येथील बिजासणी माता पान टपरीवर भावेश विजय मदरे (वय २३) हा आपल्या मित्रांसह थांबलेला असताना, संशयित रूपेश गरड, अंकुश मोरे, योगेश शिंदे आणि अभिषेक उर्फ भोला भडांगे हे (एम.एच. १५, जे. एक्स. ४९७१) या क्रमांकाच्या कारमधून आले. “तू माझ्या घरावर दगडफेक का करतोस?” असा जुना वाद उकरून काढत संशयितांनी (Suspected) भावेशला बेदम मारहाण सुरू केली. वाद इतका टोकाला गेला की, “याला मारून टाका, सोडू नका” अशी चिथावणी देत रूपेश गरड याने धारदार कोयत्याने भावेशच्या डाव्या खांद्यावर सपासप वार केले. भावेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच हल्लेखोर कारमधून पसार झाले. या गुन्ह्याचा उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करत आहेत. तर, पाेलिस संशयित रूपेश गरडचा शोध घेत असताना दुसरीकडे रूपेशची पत्नी जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. घरात फक्त रूपेशची ४९ वर्षीय आई राजश्री गरड या एकट्याच होत्या.

त्याचवेळी पहिल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पियूष येवले हा त्याच्या ४ ते ५ साथीदारांसह दोन दुचाकींवरून रूपेशच्या घराखाली पोहोचला. त्यांनी गल्लीत आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू केली. आवाजाने घाबरलेल्या राजश्री यांनी खिडकीतून खाली डोकावून पाहिले. तेव्हा रुपेश याने खिडकीत उभ्या असलेल्या राजश्री यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट बंदुकीतून (Gan) गोळी झाडली. सुदैवाने, गोळी नेमकी हुकली आणि वरच्या दिशेने निघून गेल्याने राजश्री यांचा जीव वाचला आणि अनर्थ टळला. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करत आहेत. पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल केले असून, दोन्ही गटांतील मुख्य सूत्रधारांचा कसून शोध सुरू केला आहे. तर, पहिल्या गुन्ह्यातील चार जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाचे कारण पुढे करत स्वतःचा अजेंडा राबवणे गैर

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात...