इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी शहरातील (Ghoti City) सुधानगर येथील पती-पत्नीने (Husbend and Wife) रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल (बुधवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली असून, या दोघांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी नाशिकहुन इगतपुरीकडे (Nashik to Igatpuri) जाणाऱ्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेखाली (Train) दिनेश देविदास सावंत (वय ३८) आणि विशाखा दिनेश सावंत (वय ३३) यांनी उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. त्यानंतर या घटनेची माहिती देविदास देवाजी सावंत यांनी घोटी पोलिसांना दिली.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करीत आहे. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यासह (Igatpuri Taluka) घोटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





