Sunday, September 13, 2026
Homeक्राईमNashik Fraud News : सराफाकडून २५ लाखांचा अपहार; वाढीव सोन्याच्या स्कीमध्ये अनेकांची...

Nashik Fraud News : सराफाकडून २५ लाखांचा अपहार; वाढीव सोन्याच्या स्कीमध्ये अनेकांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सराफ बाजारातील एका सराफ व्यावसायिकाने जादा परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षाअखेरीस साडेचार टक्के सोने वाढवून देतो अशी स्किम देऊन महिलेचे ३३३ ग्रॅम ५७० मिली सोने परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यातील (Thane District) डोंबिवली (पश्चिम) येथील भाईरवाडी भागातील रहिवासी शिल्पा जयंत जोशी (वय ४९ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सराफ बाजारातील मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफ या दुकानाचे (Shop) चालक संशयित सतीश बेदमुथा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सन २०१५ ते २१ एप्रिल या कालावधीत हा प्रकार घडला आहे. सतीश बेदमुथा याने फिर्यादी शिल्पा आणि त्यांची जाऊ स्वाती जोशी यांचा विश्वास संपादन केला. दोघींना एक आकर्षक योजना सांगितली.

या योजनेनुसार, सोने (Gold) एक वर्षासाठी दुकानात ठेवले, तर वर्षअखेरीस त्यावर ४.५ टक्के वाढीव सोने व्याज म्हणून दिले जाईल, असे आमिष दाखवले. त्यांनी जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनुक्रमे १९८.५७० ग्रॅम आणि १३५ ग्रॅम असे एकूण ३३३. ५७० ग्रॅम सोने (अंदाजे किंमत २५ लाख रुपये) बेदमुथाकडे सोपवले. मात्र, मुदत संपल्यानंतरही त्याने कोणते ही वाढीव सोने दिले नाही. मूळ सोन्याचे तुकडे परत न करता अपहार करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

तक्रारी वाढणार!

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिल्पा जोशी यांनी सरकाखाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बैसाणे करत असून अशाच प्रकारच्या गोल्ड स्कीममध्ये शहरातील आणि शहराबाहेरील अनेक गुंतवणूकदारांनी आपले सोने या सराफाकडे ठेवले असण्याची दाट शक्यता आहे. बेदमुथाच्या अटकेनंतरच तक्रारदारांचा आकडा आणि फसवणुकीची रक्कम किती आहे, याचा अंदाज समोर येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जमीन व्यवहारात डॉक्टरची 15 कोटींची फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सावेडी येथील डॉक्टरांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती व खोटे मालक उभे करून तब्बल 14 कोटी...