Friday, January 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : शेअर बाजारात ज्यादा पैशांचे आमिष; अधिकाऱ्यांना तीन कोटीचा...

Nashik Crime News : शेअर बाजारात ज्यादा पैशांचे आमिष; अधिकाऱ्यांना तीन कोटीचा गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर बाजारात (Share Market) ज्यादा पैशाचे आमिष दाखवून रेल्वे सुरक्षा बलाच्या सहायक उपनिरीक्षकासह उर्वरीत २५ जणांना दोन कोटी ९१ लाख रुपयांची फसवणूक (Fraud) झाल्याची घटना नाशिक रोड येथे घडली असून त्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संशयित आरोपीचे नाव ओमप्रकाश यादव असे असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी की असलम सरदार शाह (५७, रा. आरपीएफ बॅरेक, सिन्नर फाटा, नाशिक रोड) हे रेल्वे सुरक्षा बल मध्ये सहायक उपनिरीक्षक असून त्यांचा सहकारी सहायक उपनिरीक्षक अंबिका यादव यांच्यामुळे आरोपीशी ओळख झाली. त्याने शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे महत्त्व पटवून सांगितले.

YouTube video player

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणेसाठी झिरोदा, एस. एम.सी ग्लोबल, एंजल ब्रोकींग या शेअर ट्रेड करणारे कंपनीचा एजंट असुन त्याने त्याचे डिमॅट अकाउंटचे व्यवसायातून बरेच लोकांना चांगला मोबदला मिळवून दिला असल्याचे व आर्थिक गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त व्याज देणार असल्याचे आमिष दाखवले. शाह यांनी गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपीने त्याची जेल रोड, नाशिकरोड येथील भारतीय स्टेट बँकेत ओळख असून तेथून पर्सनल लोन करून देतो, तेथून मिळालेले पैसे स्कीम मध्ये गुंतविल्यास तुम्हाला दरमहा ०६ टक्के व्याज देतो. त्यामध्ये तुमचे पर्सनल लोन चा हप्ता देखील निघुन जाईल तसेच भरपूर आर्थिक फायदा होईल असे भासवले.

दरम्यान, या योजनेत रेल्वे सुरक्षा बलाच्या अनेकांनी पैसे गुंतवल्याचे सांगून आरोपीने विश्वास संपादन केला. आरोपीने शाह यांना जेलरोडवरील स्टेट बँकेत नेऊन स्वतःच्या ओळखीचा फायदा करत फिर्यादीने नावाने १० लाखांचे कर्ज मंजूर केले. त्यासाठी शाह यांच्या कागदपत्राचा वापर करण्यात आला. कर्जाचे पैसे खात्यात येताच आरोपीने ते पैसे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर शाह यांना कळाले की, आपल्याप्रमाणे ईतर सहकारी आणि इतरांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली असून फसवणुकीची एकूण रक्कम दोन कोटी, ९१ लाख असल्याने पोलिसांकडे धाव घेण्यात आली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बिडकर हे तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...