पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत संशयितास (Suspected) जेरबंद करण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे. दहा घरफोडीची उकल करण्यात आलीअसून, सोने, चांदी दागिने व रोख रक्कम अशी एकूण १३ लाख ६ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस हवालदार अमोल काळे करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद रोडवरील राधानगरी येथील कल्पेश पार्क येथील माधुरी गिरनारकर हे फ्लॅट न ८ मध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेतं, याचे राहत्या घरी २३ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला होता. नाशिक शहरात वाढत्या घरफोड्यांचे प्रमाण बघता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घरफोडीचे गुन्हे उकल करणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दोन पथके तयार केली. या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही पाहणी केली आणि मखमलाबाद रोड, ड्रिम कॅसल, गणेशनगर परिसरात एक टिम व दुसरी टिम औदुबंर नगर, अमृतधाम परिसर या भागात रात्री ११ ते पहाटे चार पावेतो ३ ते ४ दिवस सापळा लावुन बसले.
तसेच २६ ऑगस्ट २०२५ रोजी जवळपास साडे अकरा वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीत आढळून आलेल्या वर्णनाचा संशयित दिसून आला, त्यास सापळा रचून संशयित फारूक रज्जाक काकर (वय- ४८ वर्षे रा.ठि. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा जिल्हा जळगाव) ताब्यात घेण्यात आले. या संशयितांची कसून चौकशी करण्यात आली त्यात त्याने पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत ९ तर म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत १ घरफोडी केल्याची कबुली दिली. या संशयितांकडून सोन्या चांदी दागिने व रोख रक्कम असा एकूण तेरा लाख सहा हजार ६५४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ एकच्या पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त संगिता निकम, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) पवार, पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सतिश शिरसाठ, सहायक पोलिस उपनिरीक्षक संपत जाधव, पोलिस हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, पोलिस अंमलदार युवराज गायकवाड, अंकुश काळे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर योगेश वायंकडे, विनोद चितळकर, नितीन पवार, महिला पोलिस अंमलदार तनुजा शिंदे अशांनी पार पाडली आहे.





