Sunday, June 21, 2026
Homeक्राईमNashik Crime News : तीन दिवसांच्या सीसीटीव्ही विश्लेषणामुळे २३ लाखांच्या चोरीचा छडा;...

Nashik Crime News : तीन दिवसांच्या सीसीटीव्ही विश्लेषणामुळे २३ लाखांच्या चोरीचा छडा; आंतरराज्य महिला टोळी अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एस.टी. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन, कडेवर लहान मुले ठेवून भावनिक वातावरण तयार करायचे, जागेवरून वाद घालायचा आणि प्रवाशांना (Passengers) गुंगीकारक औषध देऊन लाखो रुपयांचे दागिने लंपास करायचे. अशा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या एका कानडी महिला टोळीचा नाशिक शहर पोलिसांच्या (Nashik City Police) गुन्हे शाखा अंबड युनिट-३ ने पर्दाफाश केला. धुळे-नाशिक प्रवासादरम्यान एका वृद्ध दाम्पत्याची तब्बल २३ लाख रुपयांची दागिने असलेली बॅग पळवणाऱ्या तीन सराईत महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

- Advertisement -

लागम्मा उलगय्या गड्डी (५०, रा. चिकलठाणा, जि. छत्रपती संभाजीनगर), मंजुळा मल्लेश किलीप (२५, रा. सोलापूर), पूजा व्यंकटेश किलीप (२६, रा. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. कर्नाटक) अशी संशयित महिलांची नावे आहेत. दरम्यान, या गुन्ह्याच्या तपासातून चोरीचा वेगळा पॅटर्नदेखील समोर आला आहे. टोळीतील (Gang) महिला चोरी करण्यासाठी फक्त वयोवृद्ध महिला व पुरुषांनाच टार्गेट करत होत्या.

बसमध्ये (Bus) बसताना किंवा प्रवासात सीट मिळवण्याच्या बहाण्याने त्या मुद्दाम वाद घालून प्रवाशांचे लक्ष विचलित करत चोरीचा डाव साधत होत्या. संधी मिळताच प्रवाशांना गुंगीकारक औषध देऊन त्यांचे साहित्य चोरण्यात या महिलांचा हातखंडा आहे, असे तपासात समोर आले आहे. ओझर विमानतळ रस्त्यावरील मोकळ्या मैदानावर पाल (तंबू) ठोकून ही टोळी वास्तव्यास होती. चोरी केल्यानंतर सोन्याची विल्हेवाट लावण्याचे मुख्य काम पडद्यामागे राहून त्यांचे पुरुष साथीदार करत असल्याचेही आता तपासात उघड झाले आहे.

तीन दिवसांचे फुटेज आणि सुगावा

धुळे येथील ६२ वर्षीय सुनील शिवराम येवले हे दि. ९ रोजी पत्नीसह शहादा-नाशिक बसने प्रवास करत असताना उमराणे ते पिंपळगाव बसवंतदरम्यान त्यांची २३ लाख रुपयांची सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यानंतर, गुन्हे शाखा अंबड युनिट तीनचे प्रभारी व उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. सलग तीन दिवस धुळे-नाशिक रोडवरील उमराणे बसस्टॅण्ड ते ओझर बसस्टॅण्डपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही संशयित महिला पिंपळगाव येथे बसमधून उतरून एका रिक्षात बसून जाताना दिसल्या. पोलिसांनी त्या रिक्षाचालकाचा शोध घेतला व या महिलांना ओझर येथून ताब्यात घेतले.

कबुली नाहीच…

या तिन्ही महिलांना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक केलेल्या दोन महिलांकडे लहान बालके असून, अद्याप त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना सोडवण्यासाठी पुढे आलेले नाही. या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत, याचा सखोल तपास सुरू असून तिघींनी गुन्ह्याबाबत चुप्पी साधली आहे. महिला अंमलदार या संशयित महिलांकडे सखोल चौकशी करत आहेत. तर आता या महिलांची पुरुष मंडळी रडारवर आली आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Maharashtra Monsoon Session : महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; मुख्यमंत्र्यांना लिहिले...

0
मुंबई | Mumbai राज्य विधिमंडळाचे उद्यापासून (दि.२२ जून) पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, या अधिवेशनापूर्वीच्या सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची...