Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'ऑपरेशन टायगर'ला ब्रेक! उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे निंबाळकरांशी फोनवरून संवाद, उद्या 'मातोश्री'वर...

‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक! उद्धव ठाकरेंचा खासदार ओमराजे निंबाळकरांशी फोनवरून संवाद, उद्या ‘मातोश्री’वर येणार?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे सेनेचे खासदार फोडून ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केल्याचे बोलले जात आहे. या फुटीर खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) यांचाही समावेश आहे. ओमराजे यांची भूमिका त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या निकालावर अवलंबून होती. मात्र, हा निकाल निंबाळकर कुटुंबाच्या विरोधात गेल्याने या संपूर्ण नाट्याला वेगळे वळण मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी मध्यरात्री थेट ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील (Pune) निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये तासभरापेक्षा जास्त वेळ खलबतं झाली. या बैठकीत सरदेसाई आणि पाटील यांनी ओमराजेंचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांना पक्षातच थांबण्याचे आवाहन केले. याचवेळी उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात फोनवरूनही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांची उद्धव ठाकरेंनी भूमिका जाणून घेतली. यात ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. तसेच या फोन कॉलवर ओमराजे निंबाळकर यांनी आपण अजूनही ठाकरे गटासोबत असल्याचे सांगितले. आपणच मला मोठं केलं असून, आज मी खासदार फक्त पक्षामुळे (Party) आणि तुमच्यामुळे आहे. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे, असेही निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे समजते. त्यामुळे आता ओमराजे यांच्या भूमिकेकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Nashik Shivsena UBT News : सरकारला विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा नाही –...

0
नाशिक | Nashik येथील गोल्फ क्लब मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १७ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन (Protest) सुरू आहे. या आंदोलनातील एका उपोषणकर्त्याची तब्येत १२...