Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून; एकाच...

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून; एकाच दिवसातील दुसरी घटना

एकाच दिवसातील दुसरी घटना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील नाशिकरोड (Nashik Road) येथील जय भवानीरोड परिसरातील (Jay Bhavani Road Area) साबरमती सोसायटीमध्ये आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास अमोल मेश्राम (वय ४३) नावाच्या एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सातपूर (Satpur) येथे एका युवकाने धारदार शस्त्राने जन्मदात्या आईचा (Mother) खून (Murder) केल्याची घटना समोर आली आहे .

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगला घोलप असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर स्वप्नील घोलप असे संशयित मुलाचे नाव असून, त्याला गांजाचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) संशयित स्वप्नील घोलप यास ताब्यात घेतले असून, त्याने आईवर हल्ला का केला? याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

YouTube video player

दरम्यान, याप्रकरणी पुढील पोलीस तपास सातपूर पोलीस (Satpur Police) करीत आहेत. तर गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांमुळे शहरातील खुनांच्या घटनांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. अशातच आता मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा धारदार शस्त्राने खून केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या