Monday, July 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : कारवाईचा संताप, मर्सडीजचा भुगा! बडतर्फ केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा...

Nashik Crime News : कारवाईचा संताप, मर्सडीजचा भुगा! बडतर्फ केल्याच्या रागातून विद्यार्थ्याचा वैद्यकीय महाविद्यालयात राडा

आत्महत्येची धमकी

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

होमिओपॅथी मेडिसिनच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यास (Student) शिस्तभंगाच्या कारवाईतून वैद्यकीय महाविद्यालयाने बडतर्फ केले असतानाच, हा राग मनात धरून त्याने मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज (Medical Collage) आणि हॉस्पिटलच्या आवारात तोडफोड करत राडा घातला. या घटनेत त्याने सुरक्षा केबिन, रिसेप्शनसह संचालक तथा डॉक्टरच्या महागड्या मर्सडीज कारची तोडफोड करून नुकसान केले. तसेच कॉलेज प्रशासनाला आत्महत्येची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रणव धर्मदास वाघ (वय २५, रा. अवधान, ता. जि. धुळे) असे संशयित विद्यार्थ्याचे नाव आहे.

- Advertisement -

गंगापूर पोलिसांनी (Gangapur Police) दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास संशयित प्रणव वाघ याने कॉलेजमध्ये येण्यास बंदी असतानाही मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या आवारात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. कॉलेजमधून बडतर्फ केल्याचा राग मनात धरून त्याने प्रवेशद्वारावरील फलकावर दगड फेकून मारले. त्यानंतर परिसरात पडलेला एक लोखंडी रॉड उचलून सुरक्षा केबिन, रिसेप्शनच्या पाठीमागील खिडकी आणि डॉक्टर रूमच्या दरवाजाच्या काचांवर जोरदार प्रहार करत तोडफोड केली.

हे देखील वाचा : Maharashtra Cyber News : ‘एस फोर सी’ ठेवणार नजर; महाराष्ट्र सायबर बनले राज्य सायबर गुन्हे समन्वय केंद्र

कॉलेजचे संचालक डॉ. फराज फारुक मोतीवाला (वय ४१, रा. अशोका असटोरिया, गोवर्धन) यांनी त्याला हटकले व तोडफोडीबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने डॉ. मोतीवाला यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आवारात उभी असलेली डॉ. मोतीवाला यांची मर्सडीज कारवर रॉड मारुन डिक्की आणि उजव्या बाजूच्या खिडक्यांच्या काचा फोडून तीन लाख रुपयांचे नुकसान केले.

​स्वतःला जखमी करून आत्महत्येची धमकी

तोडफोड केल्यानंतर संशयिताने स्वतःचा हात काचेवर मारून जखमी करून घेतले आणि ‘कॉलेज प्रशासनाच्या नावाने आत्महत्या करेन’ अशी धमकी देऊन दहशत पसरवली. डॉ. फराज मोतीवाला यांच्या फिर्यादीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून संशयितास नोटीस बजावण्यात आली आहे. तपास हवालदार योगेश ढमाले करत आहेत.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पोर्नो शेअरिंग महागात; नाशिकमधील आंबटशौकीन सोशल मिडिया धारकांवर गुन्हे

ताज्या बातम्या