Saturday, October 17, 2026
Homeक्राईमNashik TCS Case : गुन्ह्यांच्या गर्तेत मोडतोय निदाचा संसार! नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात...

Nashik TCS Case : गुन्ह्यांच्या गर्तेत मोडतोय निदाचा संसार! नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात सुनावणी; घटस्फोटासाठी पतीचा अर्ज

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​टीसीएस कंपनीतील (TCS Company) उच्चशिक्षित तरुण-तरुणींचे कट रचून धर्मांतराचा प्रयत्न व अत्याचार केल्याच्या गंभीर गुन्ह्यात नाव समोर आलेल्या संशयित निदा एजाज खान हिच्या अडचणीत वाढ हाेताना दिसत आहे. एका बाजूला पोलिस (Police) तपास आणि न्यायालयीन लढाईचा सामना करत असतानाच, दुसऱ्या बाजूला तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणातील ओढावलेली नामुष्की आणि बदनामीमुळे तिच्या पतीने थेट नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील पहिल्या सुनावणीदरम्यान दोघांचेही मध्यस्थी केंद्रात समुपदेशन करण्यात आले.

- Advertisement -

विशेष म्हणजे, गंभीर गुन्ह्यांचे सावट, गरोदरपण आणि सामाजिक दबावाच्या कोंडीत अडकलेली निदा खान आता आपला मोडणारा संसार वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे समोर आले आहे. ​देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यांत नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे निदा खान (वय २६) हिच्यावर २६ मार्चपासून गंभीर आरोप आहेत. गुन्ह्यांच्या तीव्रतेमुळे आणि झालेल्या बदनामीमुळे तिच्या पतीने वैवाहिक नाते संपवण्याचा निर्णय घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. पतीने घटस्फोटाची मागणी लावून धरली असून, निदा मात्र कौटुंबिक स्थैर्य जपण्यासाठी आणि संसार टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कौटुंबिक न्यायालयात (Family Court) सुरू असलेल्या या खटल्यात निदा खान हिच्यातर्फे ॲड. शोभा ताजनपुरे आणि ॲड. प्रकाश ताजनपुरे बाजू मांडत आहेत. तर तिच्या पतीच्या वतीने ॲड. नितीन पंडित काम पाहत आहेत. एकीकडे न्यायालयीन लढाई आणि दुसरीकडे गरोदरपणात संसार तुटण्याची लागलेली भीती, या दुहेरी कोंडीत निदा खान (Nida Khan) अडकल्याने या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.

​कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन

​नात्यातील तणाव दूर करण्यासाठी नाशिकरोड कौटुंबिक न्यायालयात पहिल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या उपस्थितीत समुपदेशन सत्र पार पडले. या प्रकरणी येत्या २० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा दोघांचे समुपदेशन होणार असून, त्यावेळी न्यायालयाकडून पुढील कायदेशीर कार्यवाही निश्चित केली जाईल.

​गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि स्थिती

तरुणीचे धर्मांतर व अत्याचार प्रकरणात देवळाली कॅम्प पाेलीस ठाण्यात दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल, हानिफ शेख हे असून मुंबई नाका पाेलिसांत त्याच कंपनीतील तरुणाचे धर्मांतर व फसवणूक प्रकरणात तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि निदा खान संशयित आहे. पसार असताना एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने हानिफ शेखच्या घरात निदाला आश्रय दिला होता. या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमध्ये नाशिकरोड व नाशिक जिल्हा न्यायालयाने निदा खान हिला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

ताज्या बातम्या