Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : अखेर 'त्या' खुनाचा उलगडा; मुख्य मारेकरी गजाआड

Nashik Crime News : अखेर ‘त्या’ खुनाचा उलगडा; मुख्य मारेकरी गजाआड

हत्याप्रकरणात नातगलाचा सहभाग उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

सिन्नर फाटा (Sinnar Phata) येथे मित्राशी बाेलणाऱ्या दुचाकीवरील तरुणावर एका सराईताने थेट लाेखंडी सळईने दहा ते बारा वेळेस डाेक्यात प्रहार करुन हत्या (Murder) केली. ही घटना शुक्रवारी (२) सायंकाळी घडली असतानाच, शहर गुन्हेशाखा, युनिट एकने मुख्य मारेकरी सद्दाम मलिक यास (दि.३) सकाळी वडाळागावातून अटक (Arrested) केली आहे. दरम्यान, मलिक व मृत प्रमाेद वाघ यांचे जुने भांडण व वाद हाेते. त्याचा राग काढण्यासाठी त्याने हा हल्ला चढवून हत्या केली. याबाबत गुन्हा दाखल असून मृत वाघ याचा नातलग असलेला याेगेश पगारे याचाही सहभाग उघड झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : तळीरामांची झिंग उतरणार; आषाढी अमावस्येनिमित्त पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमाेद केरूजी वाघ (वय ४०, रा. किरण नगर, चेहेडी शिव) हे शुक्रवारी सिन्नरफाटा येथील यश टायर्स समोर दुचाकीवर बसून एकाशी बाेलत असतांना संशयित योगेश पगारे व सद्दाम मलिक तेथे आले. दाेघांनी कुरापत काढून वाद (Dispute) घातला. यानंतर सद्दाम मलिक याने टायर दुकानातील ब्रेक लॉकची सळई आणत प्रमोद याचा खून करण्यासाठी त्याच्या डाेक्यावर सळईचे प्रहार केले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

यानंतर काही तासांत उपचारादरम्यान प्रमोदचा यांचा मृत्यू झाला. तर, मुख्य संशयित मलिक हा प्रमाेद वाघ याचीच दुचाकी घेऊन पसार झाला. त्यानंतर घटनेची माहिती कळताच गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके दाखल झाले. संशयितांना पकडण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, लाईव्ह सीसीटीव्हीचे फीड पाेलिसांनी तपासले. त्यानंतर युनिट एकचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक मधुकर कड (Madhukar Kad) यांनी तपास पथकास सूचना केल्या. यानंतर हवालदार विशाल काठे यांना सद्दामची गाेपनीय माहिती मिळाली.

हे देखील वाचा : Nashik Rain News : जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; गंगापूर धरण ‘इतके’ टक्के भरले

त्यानुसार सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रविंद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, नाझीमखान पठाण, विशाल देवरे, समाधान पवार यांनी वडाळागाव परिसरात शाेध घेतला. तत्पूर्वी सद्दाम हा ठिकाणे बदलून व वेश बदलून वावरत असल्याचे समजले. तरीही पथकाने तपास करत सद्दाम सलिम मलिक(वय-३३ रा. मंदाकीनी चाळ, मोहिते हॉटेल समोर, एकलहरारोड नाशिकरोड) याला वडाळागावातील राजवाड्यातून अटक केली. 

हे देखील वाचा : मुसळधार पावसामुळे चांदोरीतील प्रसिद्ध खंडेराव मंदिर पाण्याखाली

संशयित, मृत, साक्षीदार एकमेकांचे नातलग

या घटनेतील मृत प्रमाेद हा संशयित याेगेश पगारे याचा नातलग असून दाेघांत जमीनीचे वाद हाेते. तर, सद्दाम व प्रमाेदचेही अन्य काही वाद व शेतजमीन, खरेदी विक्री व्यवहारातून वाद हाेते. साेबतच सद्दाम मलिक हा रेकॉर्डवरील सराईत असुन त्याच्याविरुद्ध नाशिकराेड पाेलिसांत अपहरण, जबरी लूट व मपाेका प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचा ताबा नाशिकराेड पाेलिसांकडे साेपविण्यात आला आहे. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या