Sunday, October 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई; ४८.८१ लाखांचा...

Nashik Crime News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई; ४८.८१ लाखांचा अन्नसाठा जप्त

बेरीस्टा फ्राईड ओनियन व खाद्यतेलाचा समावेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सणासुदीच्या काळात नागरिकांना (Citizen) सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. सय्यद पिंप्री येथील ‘मे. छाया ॲग्री प्रा. लि.’ या आस्थापनावर छापा टाकून तब्बल ४८ लाख ८१ हजार ९२० रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये बेरीस्टा (फ्राईड ओनियन) आणि खाद्यतेलाचा समावेश आहे.

- Advertisement -

राज्यभरात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत अन्नपदार्थांच्या (Foodstuffs) गुणवत्तेबाबत ही मोहीम राबवली जात आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) आणि सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर रोजी सय्यद पिंप्री येथील संबंधित आस्थापनाची तपासणी करण्यात आली.

कारवाईचे कारण

सदर ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थांची साठवणूक करण्यात आली होती. तसेच हे अन्नपदार्थ कमी दर्जाचे, असुरक्षित आणि मानवी आरोग्यास हानी पोहोचवू शकणाऱ्या स्थितीत ठेवल्याचे तपासणीत निदर्शनास आले. त्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ हा साठा जप्त केला. ही कारवाई सह आयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त संदिप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रतिक भड यांनी पार पाडली. सध्या या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई (Action) केली जात आहे.

नागरिकांना तक्रारीचे आवाहन

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास किंवा भेसळयुक्त साहित्याची विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जप्त करण्यात आलेला साठा

बेरीस्टा (फ्राईड ओनियन) : १२,००८ किलो (किंमत: ₹४८,०३,२००)
रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल : ३२८ किलो (किंमत: ₹७८,७२०)
एकूण जप्त साठा : ४८,८१,९२०

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...