Tuesday, October 6, 2026
Homeक्राईमNashik Crime News : सातपूरला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४९ जण ताब्यात,...

Nashik Crime News : सातपूरला जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ४९ जण ताब्यात, ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील सातपूर परिसरातील (Satpur Area) बजरंग नगर येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर (Gambling Den) शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी (Police) ४९ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, वाहनांसह सुमारे ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

चोरी-छुप्या चालणाऱ्या अड्ड्याचा पर्दाफाश

सातपूर येथील बजरंग नगर भागातील ‘आण्णाचा मळा’ हॉटेलच्या आड चोरी-छुप्या पद्धतीने हा जुगार अड्डा चालवला जात होता. या आलिशान अड्ड्याविषयी शहर गुन्हेशाखेच्या युनिट (Crime Branch Unit) दोनला गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून अचानक धाड टाकली. यावेळी ४९ संशयित पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना रंगेहाथ आढळले.

८६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी (Police) घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोकड आणि तेथे पार्क करण्यात आलेली अनेक वाहने असा एकूण ८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या अचानक झालेल्या कारवाईमुळे नाशिक शहर आणि सातपूर परिसरातील अवैध व्यवसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2747 गोण्यांची आवक...