Tuesday, August 18, 2026
Homeक्राईमNashik Crime News : उपनगर पोलिसांची धडक कारवाई; २४ तासांत सात जणांना...

Nashik Crime News : उपनगर पोलिसांची धडक कारवाई; २४ तासांत सात जणांना अटक

जेलरोड | Jail Road

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) धडक कारवाई करत अवघ्या २४ तासांत सात संशयितांना (Suspected) ताब्यात घेतले. यामध्ये चार अल्पवयीनांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गवळीवाडा परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये पोलिसांचा (Police) धाक निर्माण झाला आहे.

- Advertisement -

गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करण्यासाठी उपनगर पोलिसांनी परिसरात विशेष मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान विविध प्रकरणांतील संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कारवाईनंतर काही आरोपींना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी (Criminal) घटनांमध्ये वाढता सहभाग हा चिंतेचा विषय ठरत असून, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

उपनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून कारवाई आणखी तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. उपनगर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे (Action) ‘कायदा मोडाल तर कारवाई अटळ’ असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : यंदा 11 दिवस दिवाळीच्या सुट्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदाच्या शैक्षणिक वर्षात (2026-27) मध्ये जिल्ह्यातील शाळांना दिवाळीच्या 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात 4 ते 14 नोव्हेंबर या काळात या सुट्ट्या...