Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी गायब

Nashik Trimbakeshwar Crime News : त्र्यंबकेश्वरमध्ये चार हॉटेल्सवर गुन्हे; ग्राहकांच्या नोंदी गायब

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) सुरक्षेचा मोर्चा हॉटेल आणि लॉजिंग व्यावसायिकांकडे वळवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर अधीक्षक विमला एम. यांच्या आदेशावरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी (Trimbakeshwar Police) हद्दीतील मिशन लॉजिंगअंतर्गत १५ हॉटेल्स व लॉजेसची एकाच वेळी ‘सरप्राईज’ झाडाझडती घेतली. तेव्हा लॉजेसमधील ग्राहकांच्या नोंदीच गायब असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार चार लॉजिंग व हॉटेल्सवर गुन्हे नोंदविले आहेत.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्यात (Simhastha Kumbhmela) कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होणार आहेत. अशा वेळी शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटणे अनिवार्य आहे. ग्राहकांच्या (Customer) नोंदी न ठेवणे हा सुरक्षेच्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा आहे. ही मोहीम केवळ सुरुवात असून, यापुढे त्र्यंबकेश्वर हद्दीतील कोणत्याही हॉटेल किंवा लॉजने हलगर्जीपणा केल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी जेलमध्ये केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांनी दिला आहे.

ग्राहकांच्या नोंदींमध्ये निष्काळजीपणा

पथकाने त्र्यंबकेश्वर हद्दीतील १५ हॉटेल्स आणि लॉजेसची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणी दरम्यान संबंधित हॉटेल्समध्ये आलेल्या ग्राहकांच्या व्यवस्थित नोंदी नसल्याचे निष्पन्न झाले. सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर निष्काळजीपणा असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महेश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर

या लॉजेसवर कारवाई

  • रॉयल ग्रीन लॉजिंग (महिरावणी शिवार)
  • पिंक सिटी लॉजिंग (महिरावणी)
    स्काय लाईट रेस्टॉरंट
    न्यू किनारा हॉटेल्स

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...