Saturday, May 2, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : वासनांध कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आणखी दोन...

Ashok Kharat Crime News : वासनांध कॅप्टन अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आणखी दोन गुन्हे दाखल, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

नाशिक | Nashik

स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलेला जाळ्यात ओढणाऱ्या अशोक एकनाथ खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याला एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) काल (बुधवारी) अटक केली. यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस (Police Custody) कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता या प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय घेतला असून, खरातवर आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…

महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांची एसायटीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे खरातची आता उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. तसेच त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यासह सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात (Vavi Police Station) अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात एका पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खरातवर एकूण तीन गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Nashik Crime News : शहरात दोन अलिशान बंगले, मिरगावला फार्म हाऊस तर पाथर्डीत ३० एकर…; वासनांध अशोक खरातकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी

दरम्यान, या तिन्ही गंभीर गुन्ह्यांमध्ये विविध कलमे लागू करण्यात आल्याने राज्य पोलीस मुख्यालयाने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सर्व संबंधित कागदपत्रे, केस डायरी आणि उपलब्ध पुरावे तात्काळ एसआयटीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एसआयटी प्रमुख सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक आता नाशिक गुन्हे शाखेने जप्त केलेले पेन ड्राइव्हमधील व्हिडिओ, इतर संभाव्य पीडित महिला, ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि राजकीय-धार्मिक संबंध यांची सखोल चौकशी करणार आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : आयुष्य उद्ध्वस्त करीन, तुला आणि तुझ्या पतीला ठार मारेल; ‘चमत्कारी’ खरातचा पीडितेला धमकावून वारंवार अत्याचार

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...