Saturday, May 2, 2026
HomeनाशिकAshok Kharat Crime News : 'स्वघोषित कॅप्टन'चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या...

Ashok Kharat Crime News : ‘स्वघोषित कॅप्टन’चा धक्कादायक कांड; ऑफिसबाहेर लोकांच्या रांगा तरीही महिलेसोबत…

Video आला समोर

नाशिक | Nashik

एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) आज (बुधवारी) स्वत:ला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या सिन्नर येथील अशोक खरात(Ashok Kharat) उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरातच्या अटकेनंतर पोलिसांनी (Police) त्याच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयावर छापा टाकला असता या छाप्यात महत्त्वाचे पुरावे आणि काही धक्कादायक व्हिडीओ सापडले आहेत. यात त्याचा धार्मिक विधीच्या नावाखाली स्वत:च्या ऑफिसमध्येच एका महिलेशी अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : मंत्र्यांचे भविष्य सांगणाऱ्या ‘स्वघोषित कॅप्टन’ला लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अटक; पोलिसांना सापडले तब्बल ५८ व्हिडीओ

याबाबत अधिक माहिती अशी की, सदर व्हिडीओमध्ये (Video) अशोक खरातच्या दालनाबाहेर शेकडो लोकांची गर्दी असताना दालनामध्ये एका महिलेसोबत पूजा करण्याच्या बहाण्याने अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करीत असल्याचे दिसत आहे. खरातने महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून पूजा करण्याचे नाटक केले. यानंतर त्याने त्या महिलेसोबत गैरवर्तन केले. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला अटक (Arrested) केल्यानंतर विविध ठिकाणांवर शोध मोहीम राबवली असता तपासात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. त्यामुळे त्याचे आणखी असे गैरकृत्य करतानाचे व्हिडीओ समोर येण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Ashok Kharat Crime : सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केल्यानंतर रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मला कल्पना…”

पोलीस काय म्हणाले?

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी सांगितले की, “सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला असून, गुन्हे शाखा युनिट एक कडून तपास सुरु आहे. महिलेने अशोक खरात याच्याविरुद्ध शारीरिक शोषणाची तक्रार दिल्यांनतर त्याआधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे. आज तपासाचा पहिला दिवस असून, खरात याच्याविरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दिली आहे. त्यामुळे आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येऊ शकतात”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अत्याचाराचे आरोप असलेल्या अशोक खरातची बड्या नेत्यांसोबत उठबस; फोटो आले समोर

फिर्यादीत काय म्हटलंय?

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ‘ओकस प्रॉपर्टीज’च्या कार्यालयात घडला. संशयित आरोपी खरातने पीडित महिलेचा धार्मिक विश्वास संपादन केला होता. त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी बोलावून गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी दिले. महिला संमोहित अवस्थेत असताना, तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती दाखवून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी खरात विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ७४, ३५२, ३५१(१) सह अत्यंत कडक अशा ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमा’ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...