नवीन प्रतिनिधी | प्रतिनिधी | New Nashik
अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Ambad MIDC Police Station) हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी नगर परिसरात मागील वादाची कुरापत काढत एका युवकाचा (Youth) निर्घृण खून (Murder) केल्याची घटना (शनिवारी) रात्री घडली आहे. विशाल हिरवाळे असे मृत युवकाचे (Youth) नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर
याबाबत अधिक माहिती अशी की, कुलदीप भीमराव ऊचीत व पियुष रवींद्र वाघ (दोघेही रा. घरकुल) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल हिरवाळे याच्यावर रविवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने सपासप वार केले. यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी नेण्यात आले,मात्र त्याचा मृत्यू (Death) झाला.
हे देखील वाचा : Bus Accident : समृद्धी महामार्गावर रिल्सच्या नादात भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अंबड एमआयडीसी पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. तर या हत्येमागील नेमके कारण व इतर कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.




