Friday, October 2, 2026
HomeनाशिकNashik Crime News : सप्तशृंगी गड बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; महिलांची टोळी कार्यरत?

Nashik Crime News : सप्तशृंगी गड बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; महिलांची टोळी कार्यरत?

सप्तशृंगीगड | वार्ताहर

सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला (Saptshrungi Devi) निघालेल्या भाविक महिलांच्या (Women’s) गळ्यातील मंगळसूत्रच असुरक्षित झाले आहे. सप्तशृंगीगड बस स्थानकावर ‘महिला चोरट्यांच्या गँग’ने अक्षरशः हैदोस घातला आहे. गर्दीचा फायदा घेऊन या टोळ्या महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, पोत, मंगळसूत्र क्षणार्धात लांबवतात आणि बस सुटण्यापूर्वीच पोबारा करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी (Darshan) मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी हजारो भाविक येतात. मात्र त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. इतर जिल्ह्यातील चोरांच्या टोळ्या पोलीस (Police) पकडतात, मग सप्तशृंगी गडासारख्या संवेदनशील ठिकाणी त्या मोकाट कशा? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘आजीबाई’च्या वेशातील चोरट्यांपासून सावध राहावे लागणार आहे. ६० ते ६५ वयोगटातील महिलांची टोळी भाविकांचे दागिने चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वयामुळे या महिलांकडे कुणाचे लक्ष जात नाही. याचाच फायदा घेऊन त्या महिलांचे सोन्याचे दागिने लंपास करत आहेत. हे थांबविण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी केली जात आहे.

ताज्या बातम्या

स्फोटक

स्फोटक साठा प्रकरण: होलसेलरची एटीएसकडून चौकशी; एक्सपायर्ड अन् दुसऱ्याच्या नावावरील परवान्यावर...

0
नाशिक। प्रतिनिधीतालुक्यातील आंगणगाव येथे दहशतवादविरोधी पथकाच्य (एटीएस) नाशिक युनिटने छापा टाकून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान संशयिताकडे आढळलेला स्फोटकांचा परवाना...