Friday, May 1, 2026
Homeक्राईमNashik Suicide News : घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेला अन्...

Nashik Suicide News : घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेला अन् दुसर्‍या दिवशी…; युवकाचा मृतदेह आढळला लटकलेल्या अवस्थेत

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

शहरातील रेल्वे तलाव परिसरातील (Talav Area) काजू बाग शिवारात इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) चिंचलेखैरे येथील एका १९ वर्षीय युवकाने (Youth) गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : “नातेवाईकांनी तुझ्यावर करणी केली, पूजाविधी कर नाही तर…”; अंधश्रध्देच्या नावाखाली महिलेची ५५ हजारांची फसवणूक

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार (दि.२७) रोजी चिंचलेखैरे येथील युवक सोमनाथ गिऱ्हे हा सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर नातेवाईकांनी शोध घेतला असता कुठेही मिळून आला नाही. मात्र, शोध घेत असताना आज (दि.२८) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास नातेवाईकांना तो काजूच्या बागेतील एका झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

हे देखील वाचा : Nashik APMC News : नाशिक बाजार समितीत गुंडांचा हैदोस; सभापतींसह संचालक आक्रमक

दरम्यान, या घटनेची माहिती इगतपुरी पोलीस ठाण्यात (Igatpuri Police Station) मयताचे नातेवाईक संजय पुनाजी गिऱ्हे (वय ४०) रा. चिंचलेखैरे यांनी देताच घटनास्थळी पोलीस पथकाने दाखल होत गळफास घेतलेल्या युवकाला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत त्यास मृत घोषीत केले. या घटनेची इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून, युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश देवराज, पोलीस हवालदार अभिजीत खांडरे यांच्यासह आदी करीत आहे.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने आर्थिक व तांत्रिक पाठबळ द्यावे – मंत्री भुजबळ

ताज्या बातम्या

Sanjay Raut : …तर मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोंबतायत? संजय राऊत...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा 'मराठी' भाषेच्या अस्मितेचा वणवा पेटला असून, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना...