नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पेठरोडवरील राहुलवाडीत सराईत गुंड सागर जाधव याच्यावर गोळीबार (Firing) करुन ठार मारण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) चौदापैकी अकरा जणांना अटक (Arrested) केली आहे. विशेष म्हणजे किरण निकम हत्येचा बदला घेण्यासाठीच निकम गँगच्या ‘बी टीम’ने गेल्या सहा वर्षांपासून सागर जाधव याच्यावर पाळत ठेऊन मंगळवारी रात्री ‘वाघमारे दाजीं’वर अंत्यसंस्कार होताच रात्री एक वाजता सागरवर गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, गोळीबार (Firing) करणारे विकी व विकास वाघ हे अद्याप अटकेपासून दूर आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
या हल्ल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांसह गुंडाविरोधी पथक व भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोधपथकाने मंगळवारी रात्रीपासून शोधमोहीम राबवून संशयित निलेश बाळू पवार (वय २७ रा. राजेय अपार्टमेंट, मेहेरधाम, पेठरोड), आकाश राहुल निकम (वय २४, राजेय अपा), रोशन राजेंद्र आहिरे (वय ३०, रा. कर्णनगर, पेठरोड), सचिन मोतीराम गांगुर्डे (वय २१, गजानन चौक, फुलेनगर), इरफान सागीर खाटीक (वय ४४, रा. जयवंत सोसायटी, आकाश पेट्रोलपंपाजवळ, म्हसरुळ), आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे (वय ३०, रा. शनि मंदिराजवळ, पेठरोड), आदित्य दिनेश आहिरे (वय-२२, रा. गोविंदा अपार्टमेंट, शिंदेनगर, मखमलाबाद रोड), नितीन रमेश खलसे (वय ३२, वैशालीनगर, पंचवटी), साहिल फिरोज शेख (वय-२१, वैशाली नगर), भारत मुंकुद कंकाळ (वय २५, राजेय सोसायटी), योगेश भिमराव जाधव (वय २९, रा. राहुलवाडी) अशी अटकेतील अकरा संशयितांची नावे आहेत.
दरम्यान, विकी आणि विकास वाघ व अमोल पारे उर्फ बबल्या व इतर साथीदार पसार असून त्यांचा कसोशीने शोध सुरु आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे व बरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली. पोलीस (Police) निरीक्षक सुनील पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सतीश शिरसाठ, उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांच्यासह पथकाने केली.
तर ते शरण आले असते…
पंचवटीतील पेठरोडवर (Peth Road) सन २०१७ मध्ये उघडे गैंगने घडविलेल्या सराईत किरण निकम याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सागरवर हा हल्ला केल्याचे समोर आले असून, सागरला न्यायालयाने या खटल्यातून निर्दोषमुक्त केले असतानाही त्याचा किरणच्या हत्येत सहभाग आहे असा संशय घेऊन त्याची ‘फिल्डिंग’ लावण्यात आली होती. मात्र, चेहऱ्यात गोळी शिरुनही नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला आहे. सागरचा गेम ‘फायनल’ झाला असताच तर काही मारेकरी स्वतःहून पोलिसांना शरण आले असते, अशी चर्चा फुलेनगर व नवनाथनगर परिसरात सुरु आहे.
सीडीआरमुळे अकरा जण गोत्यात
‘सागरचा काटा काढायचाच’ या उद्देशाने पंधराहून अधिक संशयितांनी बारंबार बैठका व भेटीगाठी घेतल्या. तसेच, त्याला कसे व कुठे गाठायचे, मारायचे याचा पूर्वनियोजित कट रचला. त्यासाठी संशयित एकमेकांच्या वारंवार संपर्कात होते, असे सीडीआरमधून समोर आले आहे. काही संशयितांनी सागरला संपविण्यासाठी फोनवर संभाषण केले. इतरांनी हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी हल्ल्याच्या दिवशी व रात्री रिक्षा तसेच दुचाकी उपलब्ध केली. काहींनी पिस्तूल व कोयते आणून दिले व काहींनी संशयितांना (Suspectd) पळून जाण्यास मदत केली, असे समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली.
मुद्दे
- निकम व उघडे टोळी तुरुंगात, पण दोघांच्या ‘बी टीम’ सक्रिय
- वाघ, पवार, निकम व पारे हे निकमांच्या बी टीमचे म्होरके
- अकरा संशयितांना पोलीस कोठडी
- गुन्ह्यासह कटात वापरलेले मोबाईल व काही वाहने हस्तगत
- मुख्य मारेकऱ्यांना अटक होताच पिस्तूल व हत्यारांची जप्ती
- पेठरोडला सागरच्या रुपाने पुन्हा एकदा शिजला होता हत्येचा कट
- पूर्ववैमनस्य व वर्चस्ववादातून गोळीबार तसेच हल्ला




