नाशिक | Nashik
स्वतःला कायद्यापेक्षा शहाणा समजून, गेल्या ७-८ वर्षांपासून नाशिक आणि अहमदनगरमधील (Nashik and Ahilyanagar) शेकडो व्यापाऱ्यांना चुना लावणाऱ्या एका अट्टल ठगबाजास शहर गुन्हे शाखा युनिट एकने अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अनिल रमेश कोपरे (३७, रा. संचराज, हिरावाडी, मूळ पिंपळगाव बसवंत) असे संशयिताचे नाव असून, चेक बाऊन्सच्या कायदेशीर पळवाटीचा आधार घेत त्याने आजवर अनेकांचे खिसे रिकामे केले होते.
संशयित अत्यंत खुबीने फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन किंवा इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करायचा व त्या बदल्यात बनावट किंवा
जाणीवपूर्वक बाऊन्स होईल असा चेक द्यायचा. व्यापाऱ्यांनी तक्रार केली की, पोलीस (Police) सिव्हिल मॅटर समजून कोर्टात जाण्याचा सल्ला द्यायचे. याच तांत्रिक बाबीचा फायदा घेत अनिल कोपरे मोकाट होता. मात्र, १८ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई नाका येथील एका दुकानातून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करताना त्याने दिलेला चेक बनावट निघाल्याने त्याचे बॅड पॅच सुरू झाला.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट (Crime Branch Unit) एककडे या तपासाची सूत्रे येताच चक्रे वेगाने फिरली. तो ओझर परिसरातील पगारमळा येथे येणार असल्याची माहिती हवालदार रवींद्र आढाव आणि आप्पा पानवळ यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि चेकच्या नावावर गेम करणाऱ्या य ठगबाजाल ताब्यात घेतले.





