Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता

मोठी बातमी! कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांसह २३ जणांची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह २३ जणांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. दोघांनाही न्यायालयाकडून क्लीन चिट मिळाली आहे. हा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना मोठा दिला आहे. निकालानंतर मीडियाशी बोलताना अरविंद कजेरीवाल भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

यावेळी न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की केवळ दावे पुरेसे नाहीत. न्यायालय केवळ ठोस आणि ठोस पुराव्यांद्वारे समर्थित आरोपावर अवलंबून राहू शकते. न्यायालयाने म्हटले की तपास यंत्रणेने सादर केलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे होते. प्रथम, न्यायालयाने उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कुलदीप सिंग यांना निर्दोष मुक्त केले. त्यानंतर, मनीष सिसोदिया यांना दिलासा मिळाला आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनाही निर्दोष मुक्त करण्यात आले.

- Advertisement -

न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना केजरिवाल म्हणाले, आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद… सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात राजकीय षडयंत्र रचले. आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकले. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकले, सहा महिने आत ठेवले गेले. जे भारताच्या इतिहासात कधी घडले नाही. केजरीवाल भ्रष्ट नाही.. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात इमानदारी कमावली. यांनी खोटी केस लावली, ते आज सिद्ध झालं.कोर्टानं म्हटलं केजरीवाल कट्टर इमानदार,मनीष सिसोदिया कट्टर इमानदार आहेत. आम आदमी पार्टी कट्टर इमानदार आहे.देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Accident News : तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; ५...

0
बीड | Beed बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यात (Majalgaon Taluka) खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळ आज (रविवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण...