Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमNashik Crime : लोंढे, राजवाडेनंतर पोलिसांनी भाजपच्या 'या' माजी नगरसेवकाला चौकशीसाठी घेतलं...

Nashik Crime : लोंढे, राजवाडेनंतर पोलिसांनी भाजपच्या ‘या’ माजी नगरसेवकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला (Nashik Crime) आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) चांगलीच कंबर कसली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही पोलीस आयुक्तांना ‘फ्री हँण्ड’दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नाशिक पोलिस गेल्या काही दिवसांपासून ॲक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी (Police) सातपूर येथील ऑरा’ बारमधील गोळीबार प्रकरणी (Firing Case) प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांच्यासह त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले. तर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे अद्याप फरार असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

YouTube video player

तर विसेमळा गोळीबार प्रकरणी भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचे समर्थक बाबासाहेब ऊर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखेने अटक (Arrested) केली आहे. त्यांना नाशिक न्यायालयाने (Nashik Court) सोमवारपर्यंत (दि. १३) पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित अजय बागूल अद्याप पसार आहे.

त्यानंतर आता पोलिसांनी भाजपचा (BJP) माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही तासांपासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. शहाणेला कोणत्या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, गंभीर गुन्हे दाखल असलेले माजी नगरसेवक पवन पवार, योगेश शेवरे यांच्यासह विक्रम नागरे, राकेश कोष्टी यांचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. तसेच पोलिसांच्या गुन्हेगारांवरील (Criminal) कारवाईचे नागरिकांकडून स्वागत देखील केले जात आहे.

ताज्या बातम्या

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ च्या खर्चात १५ हजार कोटींची वाढ; आता...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai   कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) शेतकऱ्यांच्या (Farmer) विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी 'शक्तिपीठ' महामार्गाच्या आखणीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास...