नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
खूनाच्या गुन्ह्यातून (Murder Case) मुक्तता झाल्यानंतर मध्यवर्ती कारागृहातून (Central Jail) बाहेर पडल्यावर संबंधित आरोपीची मिरवणूक काढणाऱ्या गुंडाच्या समर्थकांची नाशिकरोड परिसरातून (Nashik Road Area) पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत धिंड काढण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) खूनाच्या गुन्ह्यात असलेला संशयित महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याची २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी संशयित प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे,उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे,सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी यांच्यासह १५ ते २० संशयितांनी सोबत धारदार शस्त्र बाळगून चारचाकी व दुचाकी वाहनावर मिरवणूक काढून सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस मज्जाव करीत नागरिकांच्या अंगावर धरून दहशत निर्माण केली.
तसेच मोबाईलवर (Mobile) चित्रण करीत रिल्स बनून सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेनंतर नाशिकरोड पोलिसांनी त्वरित दखल घेऊन मिरवणूक काढणाऱ्यांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सदर घटनेप्रकरणी,पोलिस शिपाई अरुण गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) संशयितविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी सर्वच संशयितांची (Suspected) धरपकड करीत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली. काल (रविवारी) न्यायालयात नेतांना त्यांची धिंड काढण्यात आली. या संदर्भात पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा, टेमकर करीत आहेत.




