पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant
येथे भरदिवसा धाडसी घरफोडीचा (Burglary) प्रकार घडला असून, सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे पाच लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) चोरटा कैद झाला.
पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील चिंचखेड रस्त्यावरील विठ्ठल मंदिर परिसरात ॲड. आदेश मोगल सहकुटुंब राहतात. मंगळवारी (दि.१०) ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. ती संधी साधत दुपारच्या दरम्यान अज्ञात चोरटयाने आदेश मोगल यांच्या घराच्या मुख्य दरवाजास लावलेले कडी कोयंडा व कुलूप तोडून घरात प्रवेश केला.यात घरातील कपाट तोडून त्यातील दोन लाख ७७ हजारांचे दागिने व दोन लाखांची रोकड, असा सुमारे पाच लाखांचा ऐवज लांबविला.
दरम्यान, ॲड. मोगल घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यंच्या हालचाली कैद झाल्या आहेत. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३). ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत.





