दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
शेतकर्याच्या घराचे (Farmer House) दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरातील कपाटातील सुवर्णलंकार व रोख रकमेसह ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज अज्ञातानी घरफोडी (Robbery) करुन चोरुन नेला. याबाबत दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश बबन विधाते रा. शिवाजीनगर, भानगडवाडी जानोरी हे पत्नी व मुलांसह वास्तव्यास असून, त्यांचे घरालगत कुटुंबीय राहतात. त्यांच्यावर तज्ञांकडून मानसोपचार सुरु असल्याने ते औषधे घेऊन रात्रीच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी पत्नी व मुले हे ओझर (Ozer) येथे यात्रेला गेले होते. दरवाजाला बाहेरुन कुलुप लावून गेले होते. यात्रा आटोपून रात्री बारा वाजता पत्नी व मुले घरी परतताच त्यांना दरवाजाचे कुलुप तोडलेल्या अवस्थेत दिसले. यावेळी संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली.
यानंतर त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील वस्तू अस्तव्यस्त दिसल्या. त्यांनी दिनेश यांना उठविले व घरातील कपाट व इतर ठिकाणी तपासणी केली असता कपाटातील ५ हजार रुपये रोख व तीन चांदीचे सिक्के गायब असल्याचे निदर्शनास आले. तर कपाटाशेजारील पिशवीतील ११ हजार रुपये रोख व कानातील टाप्स व वेलजोड यांची चोरी झाल्याचे दिसले. १६ हजार रुपये रोख २४०० रुपयांचे चांदीचे सिक्के, २० हजाराचे चार ग्रम वजनाचे कानातील सोन्याचे टाप्स, १५ हजाराचे कानातील वेलजोड असा एकूण ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज याची चोरी गेला.
तसेच स्कूल बॅग व त्यातील वह्या पुस्तके व इतर वस्तु घराबाहेर दिसुन आल्या. ओझर शिवारातील दोन घरांमध्ये चोरी झाल्याची माहीती विधाते यांना मिळाली. दरम्यान जानोरी परीसरात चोरट्यांनी धुमाकुळ घातल्याने भितीचे वातावरण आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे. धाडसी घरफोडी करणार्या संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय कोरडे करत आहे.




