Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : शर्माला 'खंडणी उद्याेग' भाेवला; सव्वा महिन्यांत सात गुन्हे, दाेन...

Nashik Crime : शर्माला ‘खंडणी उद्याेग’ भाेवला; सव्वा महिन्यांत सात गुन्हे, दाेन गुन्ह्यांत नव्याने अटक हाेणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील अंबड व सातपूर औद्याेगिक वसाहतींत खासगी कंपन्यांच्या ‘अतिक्रमण’ संदर्भाने माहितीचा अधिकार व तक्रारी नाेंदवून उद्याेजकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणात तुरुंगात असलेला कथित सामाजिक कार्यकर्ता संताेष शर्मा (Santosh Sharma) याच्यावर मंगळवारी(दि. ९) अंबड पाेलिसांत (Ambad Police) पुन्हा खंडणीचे दाेन गुन्हे नाेंद झाले आहेत. गेल्या सव्वा महिन्यांत शर्मासह त्याच्या चाैकडीवर गंभीर स्वरुपाच्या कलमांन्वये एकूण सात गुन्हे नाेंद असून गेल्या तीन वर्षांत शर्माने माहितीच्या आधिकाराचा गैरवापर करुन शेकडाे खाेट्या तक्रार अर्जांनुसार ‘एमआयडीसी’तील उद्याेजकांना जेरीस आणल्याचे उघड झाले आहे. 

- Advertisement -

संताेष शर्मा (रा. प्रियदर्शनी बंगलाे, संसरी गाव, देवळाली कॅम्प) हा अनेक उद्याेगांतील अतिक्रमण, जागा व तत्सम बाबींचे व्हिडीओ व फाेटाे काढून ‘एमआयडीसी’ कार्यालयांत तक्रारी नाेंदवून उद्याेजकांना उपाेषणाची तसेच माहिती अधिकार टाकण्याची धमकी देत हाेता. त्याला संशयित (Suspect) शशी राजपूत, रोहित म्हस्के व कैलास दवंडे यांनी साथ दिल्याचे समाेर आले असून त्यांच्यावरही फास आवळण्यात आला आहे. ‘नाहक त्रास नकाे’ म्हणूण अनेक उद्याेजकांनी व कंपनी मालकांनी त्याला खंडणी दिल्याचे उघड झाले आहे. दरम्यान त्याच्याविराेधात उद्याेजक संजय महाजन यांनी पहिली फिर्याद नाेंदविली.

YouTube video player

त्यानुसार, पाचपैकी एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात गुन्हेशाखा युनिट एकने त्याला काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पमधून गजाआड केले हाेते. दरम्यान, हा गुन्हा नाेंद असतानाच त्याच्याविराेधात शैलेश अशाेक भामरे व राजाराम बुधाजी पानसरे या उद्याेजकांनी फिर्यादी नाेंदविल्या. त्यानंतर, आणखी दाेघा उद्याेजकांनी तक्रार नाेंदविल्या. त्याला व काही साथीदारांना या गुन्ह्यांत वारंवार अटक (Arrested) झाली असून मंगळवारी (दि. २) शैलेश रुपचंद नारखेडे(रा. आकाशवाणी टाॅवर, गंगापूर राेड) व याेगिता धनंजय आहेर या उद्याेजकांनी शर्माविराेधात खंडणी उकळल्यासह धमकीची फिर्याद नाेंदविली आहे. तपास अनुक्रमे सहायक निरीक्षक मुगले व उपनिरीक्षक शेवाळे करत आहेत. शर्माने आतापर्यंत अनेक उद्याेजकांकडून एकूण ४० लाखांहून अधिकची खंडणी उकळल्याचे तपासात समाेर येते आहे. 

दाेन्ही तक्रारी अशा… 

उद्याेजक आहेर व नारखेडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,  शर्मासह साथीदारांनी जानेवारी ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत एमआयीडीसीतल दाेन्ही कंपन्यांत येऊन गुप्तपणे फाेटाे व व्हिडीओ काढून अतिक्रमणसंदर्भाने तक्रारी केल्या. प्रकरणे मिटविण्यासाठी तीन ते साडेतीन लाखांची खंडणी मागून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आहेर यांनी ९० हजार रुपये तर नारखेडे यांनी एक लाख ६० हजारांची खंडणी भितीपाेटी दिली. तरीही छळ सुरुच असल्याने अखेर दाेघांनी तक्रारी नाेंदविल्या आहेत. 

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...