Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : धोत्रे हत्येच्या तपासासाठी 'एसआयटी'; निमसेचा परराज्यात शोध

Nashik Crime : धोत्रे हत्येच्या तपासासाठी ‘एसआयटी’; निमसेचा परराज्यात शोध

आश्वासन मिळताच तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नांदूर नाक्याजवळील जनार्दननगरात उद्धव निमसे (Uddhav Nimse) गटाने धोत्रे गटावर (Dhotre Group) चढविलेल्या हल्ल्यात मृत्यू (Death) झालेल्या राहुल धोत्रे याच्या मृतदेहावर शनिवारी (दि. ३०) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) केला जाणार आहे. त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी काढले आहेत.

- Advertisement -

धोत्रे गटाला विविध पाच मागण्यांचे आश्वासन मिळाले असून परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत (Monika Raut) यांनी शनिवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात संतप्त धोत्रे कुटुंबासह नातलगांची भेट घेऊन बिनंती केली होती. दरम्यान, तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांची चौकशी होणार आहे. त्यामुळे आता गेल्या आठ दिवसांपासून तणावपूर्ण झालेली नांदूरनाका येथील परिस्थिती निवळली आहे.

YouTube video player

छत्रपती संभाजीनगर रोडवरील नांदूरनाका (Nandur Naka) येथे पोळा सणाच्या दिवशी ( २२ ऑगस्ट) रोजी निमसे गटाने धोत्रे गटावर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी राहुल संजय धोत्रे याचा शुक्रवारी (दि.२९) उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका गटाने निवडणुकीत मदत न केल्याने दोन्ही गटांत ही धुसफूस वाढल्याची चर्चा होत असून राहुलच्या हत्येच्या निषेधार्थ कुटुंबासह मित्र परिवाराने निमसेंच्या अटकेची मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.त्यामुळे २२ तास उलटूनही मृतदेह जिल्हा रुग्णालयात होता.

इनकॅमेरा शवविच्छेदन झाल्यावर धोत्रे गटासह बंचित बहुजन आघाडी व अॅड. सुरेश आव्हाड यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निमसेंना अटक (Arrested) करुन तपासात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे वर्ग करावा, अशी मागणी केली होती. त्यावर सायंकाळी उशिरापर्यंत कार्यवाही न झाल्याने मृतदेह शवागारातच होता. अखेर शुक्रवारी रात्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने एसआयटीची घोषणा करुन तसे आदेश पारित केले.

त्यानंतर, शनिवारी सकाळी परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख नितीन जाधव, वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड, संजय पिसे पथकांसह जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तेव्हा संतप्त धोत्रे कुटुंबाच्या भावना जाणून घेत राऊत यांनी त्यांना सखोल चौकशीसह एसआयटी तपासाचे आश्वासन दिले. यानंतर, कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेऊन नांदूर अमरधाममध्ये तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, प्रकरणात याआधीच सात संशयित अटकेत असून निमसेंसह टोळीबर प्राणघातक हल्ला, खून व बेकायदेशिर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. तर, निमसे सध्या पसार असून त्यांनी जिल्हा न्यायालयात (District Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यावर त्यांना तीन दिवस अंतरिम मिळाला होता. परंतु, जखमी राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने निमसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता, जनार्दननगरातील तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून व्यवहार पूर्ववत होत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणूण परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, एसआरपीएफसह आरसीपीच्या तुकड्या तैनात आहेत.

पाच पथके रवाना

माजी नगरसेवक व भाजप पदाधिकारी उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्या निर्धावलेल्या टय्यांना अटक करण्यासाठी शहर पोलिसांची पाच पथके मागावर आहेत. एक पथक परराज्यात असून लवकरच निमसेंसह इतरांना अटक केली जाईल, असे मोनिका राऊत यांनी सांगितले आहे. तर, आता या हल्ल्यासह वाढीव कलमान्वये खुनाच्या दाखल गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक निखील बोंडे यांच्याकडून काढून घेण्यात आला असून अंबड विभागाचे सहायक आयुक्त शेखर देशमुख हे पुढील तपास करणार आहेत, दरम्यान, निमसे गटावर अॅट्रोसिटीसह मोक्का कारवाई करण्यासंदर्भातही आयुक्तालय विचाराधीन आहे, असे समजते.

एसआयटी अशी…

राहुलवर हल्ला कसा व का झाला, याची नेमकी कारणे एसआयटीतून उघड होणार आहे. तसेच, उद्धव निमसे यांचा प्रकरणात काय व कसा सहभाग आहे, याचीही माहिती लवकरच समोर येणार आहे. शेखर देशमुख हे सखोल तपास करतील. आडगाव पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याच्या तपासात कोणत्या अधिकारी व अमलदारांनी हलगर्जीपणा केला, याची चौकशी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके हे करणार आहेत. विशेष म्हणजे मृत राहुलचा भाऊ आकाशसह इतर साक्षीदारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण पुरविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

मुद्दे

  • अंत्यसंस्कारावेळी उद्धव निमसेंविरोधात घोषणाबाजी
  • एसआयटीतून सर्वच अंगांनी तपास
  • निमसेंचा आका कोण, याचा तपास करण्याची मागणी
  • धोत्रेच्या निवासस्थानी फिक्स पॉईंट नेमून प्रभावी गस्त
  • वाढीव कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंद
  • दोन दिवसांत अटक करण्याची धोत्रे गटाची मागणी
  • शनिवारी (दि.३०) दुपारी चार वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार
  • युनिट एक, दोन, खंडणी आणि गुंडा विरोधी पथके रवाना
  • एका संशयिताचे शेवटचे लोकेशन मध्यप्रदेशात

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...