Sunday, September 27, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : जप्त रजिस्टरमध्ये पाेलीस ठाण्यातच फेरफार; एसआयटी तपासात धक्कादायक...

Shalarth ID Scam : जप्त रजिस्टरमध्ये पाेलीस ठाण्यातच फेरफार; एसआयटी तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तब्बल १६० काेटी रुपयांच्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या (Shalarth ID Scam) तपासातून आता एक धक्कादायक माहिती समाेर आली आहे. विशेष तपास पथकाच्या तपासादरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्यातच (Nashik Road Police Station) जप्त करून ठेवलेल्या शासकीय जावक नोंदवहीत (रजिस्टर) संशयितांनी फेरफार केल्याचे उघड झाले आहे. संशयितांचे हे धाडस पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

​एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागातील (Education Departmnet) उच्चपदस्थ अधिकारी, खासगी शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, लिपिक आणि एजंट यांनी आपापसात संगनमत करून शासकीय तिजोरीवर दरोडा टाकला आहे. कागदोपत्री शाळा आणि शिक्षक दाखवून कोट्यवधी रुपयांचा निधी लाटण्यात आला. ​संशयित मनोज पाटील याने तीन शाळांशी संबंधित तब्बल ४८ कर्मचाऱ्यांच्या घोटाळ्यात सहभाग दर्शवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कागदोपत्री दाखवलेली ‘स्वामी समर्थ माध्यमिक शाळा, पारोळा’ ही संस्था प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. केवळ कागदावर शाळा दाखवून २१ बनावट शालार्थ आयडी तयार केले गेले आणि शासनाचा निधी लाटला गेला.

सख्ख्या भावांच्या नावे तब्बल १८ लाख लाटले. तर, वैयक्तिक अपहाराच्या (Kidnnaping) प्रकरणात ‘श्री दत्त विद्यामंदिर’ (पाटोदा) येथील वरिष्ठ लिपिक संशयित राहुल पवार याने माजी मुख्याध्यापकाशी हातमिळवणी केली. शाळेत प्रत्यक्षात कधीही कामावर नसलेल्या स्वतःच्या तीन चुलत भावांचे बनावट रुजू अहवाल (जॉयनिंग रिपोर्ट) तयार केले. या बनावट नोंदींच्या आधारे तब्बल १८ लाख ९४ हजार रुपयांचे बेकायदेशीर वेतन उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर, नाशिकरोड पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या जावक नोंदवहीत (रजिस्टर) संशयितांनी थेट पोलीस ठाण्यातच (Police Station) फेरफार केल्याचे समाेर आले आहे.

शरद शिंदेचे धाडस

संस्थाचालक व एजंट शरद दयाराम शिंदे याने आठ शाळांमधील ५१ बोगस कर्मचाऱ्यांची नावे जप्त केलेल्या जावक नोंदवहीत स्वतः लिहीली. हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बेकायदेशीर कामात अमळनेर येथील श्री शिवाजी हायस्कूलचा लिपिक संशयित अविनाश उर्फ पप्पू बळवंत पाटील याने त्याला मदत केली. बेलगंगा टेक्निकल स्कूलचे उपाध्यक्ष संशयित रामकृष्ण पाटील, माजी मुख्याध्यापक कैलास सोनवणे, शिक्षक भूषण पाटील आणि शांताराम जाधव या चौघांनी जप्त केलेल्या जावक रजिस्टरच्या पान क्रमांक ९८ वर पोलीस ठाण्यातच बनावट नोंदी केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

​अटकपूर्व जामीन फेटाळला

​उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून ते लिपिक आणि एजंटपर्यंत सर्वांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा संघटित गुन्हा केला असल्याचे एसआयटीच्या तपासातून सिद्ध झाले आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पोलीस (Police) आता या प्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...