Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : शुभम पार्क खुनातील संशयित ताब्यात

Nashik Crime : शुभम पार्क खुनातील संशयित ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शुभम पार्क (Shubham Park) येथील सेंट जोसेफ चर्चसमोर गुरुवारी रात्री झालेल्या एका तरुणाच्या (Youth) खूनप्रकरणी अंबड पोलिसांनी अवघ्या आठ तासांच्या आत उल्लेखनीय कामगिरी करत दोघा संशयितांसह दोन अल्पवयीनांना शिताफीने ताब्यात घेतले. गुरुवारी सुमितवर वार केल्यानंतर चारही संशयितांनी (Suspected) रस्त्यावरून दुचाकीने जाणारे नैतिक मुरलीधर ठाकुर (रा. शुभम पार्कचर्च जवळ, उत्तम नगर नवीन नाशिक) यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांची मोटार सायकल बळजबरीने चोरी केली ते घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी देखील अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

याप्रकरणी अंबड पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोथ पथकाचे उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत व गुन्हे शोध पथकाचा पथकाने यांनी अहोरात्र मेहनत करून सदर गुन्ह्यात फरार असलेले संशयित अरूण उत्तम वैरागर (२०, रा. शिरसाठ यांच्या रूममध्ये भाडेतत्वावर, लिवर फिटनेस जिमच्या मागे, फडोळ मळा अंबड, नाशिक), प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे (१९, रा. स्वामी समर्थ केंद्राच्या मागील गल्लीत, माऊली लॉन्स नवळ, डि.जी.पी. नगर, अंबड, नाशिक) व २ विधिसंघर्षित बालक यांना राणे नगर, मुंबई आग्रा हायवे, नाशिक येथून ताब्यात घेवून सदरचे दोन्ही गुन्हे आठ तासांच्या आत उघडकीस आणले.

YouTube video player

दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे, पोलीस निरिक्षक प्रशासन सुनील पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत शिरसाठ, सपोनि किरण रौंदळे, सपोनि दीपक बागुल, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, उपनिरिक्षक नितीन फुलपगारे, उपनिरिक्षक संदेश पाडवी, हवालदार उमाकांत टिळेकर, अंमलदार राहुल जगझाप, मयूर पवार, तुषार मते, स्वप्निल जुद्रे, सागर जाधव, प्रविण राठोड, अनिल गाढवे, सचिन करंजे, समाधान शिंदे, संदिप भुरे, दिपक निकम, योगेश सिरसाठ, आनिनाथ बारगजे, विष्णु जाधव, गणेश कोठुळे, संदिप डावरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पवार करत आहेत.

सुमित देवरे याच्यावर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना समजताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुमित जिवंत असल्याचे हांडे यांना समजले. हांडे यांनी क्षणाचाही विलंब न करता सुमितला पोलीस गाडीमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. हांडे यांनी दाखवलेल्या समय सूचकतेमुळे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले.

अवघ्या आठ तासांच्या आत अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाने सदर खुनाचे संशयित शोधून काढल्याबद्दल पोलीस उपायुक्त परिमंडळ २ व सहायक आयुक्त शेखर देशमुख यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्प देऊन सत्कार केला.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...