Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime : तोतया आयपीएसचे कारनामे उघड; आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी बनला बोगस अधिकारी

Nashik Crime : तोतया आयपीएसचे कारनामे उघड; आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी बनला बोगस अधिकारी

गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुलाने ‘आयपीएस’ अधिकारी (IPS Officer) व्हावे, रुबाबात जगावे, अशी इच्छा मनाशी बाळगलेल्या आई-वडिलांचे स्वप्न हवेत विक नये, यासाठी परप्रांतीय गौरव रामअच्छेबर मिश्राने यूपीएससी परीक्षा क्लिअर न करता आयपीएस आणि आयआरएसची वर्दी परिधान करुन स्वतःला क्लासवन अधिकारी भासवून अनेक व्यावसायिकांना (Professional) कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. मिश्रावर आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून पाथर्डी फाट्यावरील एका लॉन्ड्री कॉन्ट्रॅक्टरला रेल्वे डब्यांच्या बर्थमधील कपडे धुण्याचे कंत्राट देण्याचे सांगून त्याच्याकडून ३६ लाख रुपये उकळले आहेत. तसेच हे पैसे (Money) परत मागण्यास गेलेल्या तक्रारदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार उघड झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा

दर्शन लल्लूराम कनोजिया (वय ४३, रा. गंगा हाईट्स, गजानननगर, पाथर्डी फाटा) हे लॉन्ड्री कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी गौरव मिश्रा (वय ३७, रा. हरिविश्व सोसायटी, पाथर्डी फाटा) याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात (दि.२) एफआयआर दाखल केला आहे. त्यानुसार, जानेवारी २०१७ ते १३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संशयित गौरव मिश्रा हा कनोजिया यांच्या अभियंतानगरातील योगीराज अपार्टमेमट येथे आला. त्याने ओळख वाढवून कनोजिया यांच्या लॉन्ड्री व्यवसायाची माहिती घेत पंचवटीतील नवनाथनगरमधील फॅक्टरीवर व्हिजीट दिली. ओळख बाढत असतानाच, गौरबने रेल्वेतील कपडे धुलाईच्या ठेक्याची माहिती कनोजियांना देत मी भारतीय रेल्वेमध्ये आयपीएस दर्जाचा अधिकारी असून सध्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यासंदर्भातील ओळखपत्र दाखविले. तेव्हा मिश्राने लाल निळ्या रंगाचे दिवे लावलेली कार दाखवून सोबत सफारी ड्रेस परिधान केलेल्या कथित सुरक्षा रक्षकांचा (Security Guards) गराडा अवतीभोवती असल्याचा फार्स निर्माण केला.

हे देखील वाचा : Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

महानिरीक्षक असल्याने ओळखीच्या जोरावर रेल्वेचे टेंडर मिळत असल्याचे बनावट दस्तऐवज दाखविले, पण, सरकारी लोकसेवक असल्याने मला व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे पत्नी प्रिती मिश्रा हिच्या नाचे अथर्व कन्स्ट्रक्शन नावाने रेल्वेसोबत टेंडरमार्फत व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार, ‘मी रेल्वेमध्ये तुम्हाला चांगल्या टेंडर मिळवून देतो. जास्तीचा नफा मिळेल’, असे आमिष दाखवून वेळोवेळी कनोजिया यांच्याकडून ३६ लाख ६४ हजार रुपये उकळले. मात्र, कंत्राट मिळत नसल्याने कनोजिया यांनी मिश्राकडे ३६ लाख रुपये परत मागितले असता, त्याने कनोजिया यांच्या घरी जात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

कोठडीत वाढ

१२ ऑक्टोबर रोजी मिश्राच्या घरावर गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हेशाखा युनिट दोनने छापा टाकून घरझडतीतून महागडे मोबाइल,लॅपटॉप, ‘एसीपी’ दर्जाच्या अधिकाऱ्याचा गणवेश, रेव्हेन्यू अधिकाऱ्याचा गणवेश, धातूचे लोगो, बंद अवस्थेतील दोन वायरलेस सेट व पोलीस व एसीबीची सरकारी मोहोर असलेले कागदपत्रे जप्त केली होती. यासंदर्भाने मिश्रावर ‘तोतयेगिरी केल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलिसांत दाखल करण्यात आला. त्यानंतर सिडकोतील राणेनगरात राहणारे ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक विठ्ठल सखाराम वाकडे हे अंबड पोलीस ठाण्यात आले. त्यांनी मिश्राच्या बोग सगिरीचा पर्दाफाश केला. त्यानंतर गुन्ह्यात मिश्राला अटक झाली. तेव्हापासून तो अटकेत आहे. त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ झाली आहे.

हे देखील वाचा : Assembly Election 2024 : नाशिक जिल्ह्यात बंडाचे झेंडे कायम; दुरंगी-चौरंगी होणार लढती

मुद्दे

मिश्रावर आतापर्यंत अंबडला फसवणुकीचे दोन गुन्हे
इंदिरानगरला ठकबाजी, तोतयेगिरीचा गुन्हा, तपास अपूर्ण
आणखी तक्रारी वाढणार
फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्याचे आव्हान
बोगस आयएसएस पूजा खेडकरलाही टाकले मागे
यूट्यूब, इन्स्टावर व्हिडीओ पाहून आयपीएस पदाचे धडे गिखले
मिश्राचे तोंडावर बोट, तपासात असहकार्य, पोलिसांचा दावा
कष्टाशिवाय मौजमजेसाठी निवडला मार्ग

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या