Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : अवैध सावकारीत पती-पत्नी; घरझडतीतून कोरे स्टॅम्पपेपर, धनादेश जप्त

Nashik Crime : अवैध सावकारीत पती-पत्नी; घरझडतीतून कोरे स्टॅम्पपेपर, धनादेश जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील उपनगर भागात चक्क एका दाम्पत्यानेच अवैध सावकारी (Money Lender) फोफावल्याचे उघड झाले आहे. मनमानी व्याज आकारणी आणि बेकायदेशीर कर्ज वसुलीप्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शनिवारी (दि. ३) देवळाली गावातील अवैध सावकार संशयित सचिन बबनगिर गोसावी व त्याची पत्नी पूनम सचिन गोसावी यांच्या घरावर छापा टाकून सावकारीची कागदपत्रे, कोरे स्टॅम्प पेपर्स व धनादेश जप्त केले आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : नाशिकचे लाचखोर राज्यात ‘नंबर वन’; यंदाही पुणे, संभाजीनगरला टाकले मागे

YouTube video player

सहाय्यक सहकार अधिकारी कैलास रामदास आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar Police Station) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. देवळाली गावातील धनगर गल्ली येथे गोसावी दाम्पत्याकडून अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपनिबंधक कार्यालयाला मिळाली होती. तसेच त्यासंदर्भाने तक्रारी दाखल होत्या. परवाना नसताना अनेक गरजू नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यावर अवाजवी व्याज आकारल्याचे व कर्जफेडीसाठी दबाव टाकण्याचे विविध तक्रारीत नमूद आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : भरारी पथकाकडून पावणे दोन लाखांचा मद्यसाठा जप्त; प्रलोभन-दमबाजीवर पथकांचे लक्ष

त्यानुसार, (दि. ३) शनिवारी गोसावीच्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान कोरे धनादेश, स्टॅम्प पेपर्स, व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही कागदपत्रे (Documents) पाहता अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक पुरावे मिळाल्याने पुढील कायदेशीर कारवाई (Action) सुरु झाली आहे.

नववर्षातील पहिला गुन्हा

सन २०२५ मध्ये वर्षभरात नाशिककरांनी अवैध सावकारीच्या जाचाचा सामना केला. अनेकांनी जीवनयात्राही संपविली. अनेक कुटुंबे मानसिक तणावात सापडली. अशा पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सुरुवातीलाच उपनगर पोलीस ठाण्यात अवैध सावकारीचा पहिला गुन्हा दाखल झाल्याने यंदा तरी या जाचातून सुटका होईल का, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...