Monday, March 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAshok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT...

Ashok Kharat Crime News : ज्या कार्यालयात महिलांसोबत करायचा अश्लील चाळे SIT ने तेच केले सील; लिंगपिसाट खरातला दणका

शिवानिका संस्थेचे बँक खातेही गोठवलं

नाशिक | Nashik

अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरातच्या (Ashok Kharat) नाड्या पोलिसांनी आवळण्यास सुरुवात केली आहे. खरातच्या मालमत्तेचे आकडे मोठे असून, एसायटीने त्याच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या कार्यालयात खरात महिलांचे शोषण करायचा त्या कार्यालयाची एसायटीने झाडाझडती घेत त्याला सील लावले आहे. त्यामुळे विकृत खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात (Canda Corner Area) असलेल्या खरातच्या ओकस कार्यालयाची एसआयटीच्या पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली. यात एसआयटीच्या हाती अनेक कागदपत्रे लागल्याची माहिती मिळत आहे. यानंतर एसआयटीच्या पथकाने त्याचे कार्यालय सील केले. त्यामुळे आता एसआयटीला खरातच्या कार्यालयातून कोणती कागदपत्रे मिळाली आहेत, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’

दुसरीकडे अशोक खरातच्या शिवानिका संस्थेचे (Shivanika Sanstha) बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. तसेच विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे खरातच्या कुटुंबियांच्या नावे किती संपत्ती आहेत. किती मालमत्ता, कुठे जमीन, कुठे प्लॉट, फ्लॅट, कार व इतर साधने आहेत याची कुंडलीच बाहेर येणार आहे. याशिवाय त्याची जमीन, घर, दुकानांसह त्याच्या राज्यभरातील मालमत्तेचा नोंदणी विभागाकडून शोध सुरू आहे. या तपासात खरातची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता उघड होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime : “अवतार पूजा केली नाही तर मृत्यू होईल, हातातील तांदूळ सांडले तर नाग डसेल”; भोंदू खरातने बांधकाम व्यावसायिकास भीती घालून मर्सिडीज लांबविली

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bavankule : अधिकाऱ्यांचे भोंदू खरातशी संबंध असल्याचे पुरावे द्या; चंद्रशेखर...

0
मुंबई । Mumbai स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या 'काळ्या साम्राज्या'चे एकामागून एक धक्कादायक पदर आता उलगडू लागले आहेत. खरातविरोधात दाखल झालेल्या...