Friday, April 25, 2025
HomeनाशिकNashik Crime : सराईत बनले दराेडेखाेर; तिघे अटकेत

Nashik Crime : सराईत बनले दराेडेखाेर; तिघे अटकेत

उपनगर, देवळाली कॅम्प येथे बंदुकीचा धाक दाखवून लूट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळाली कँम्प आणि उपनगर भागात (Upnagar Area) मागील दाेन दिवसांत जबरी लूट करुन आय ट्वेंटी कारमधून फिरुन सामान्यांच्या मनात धडकी भरविणाऱ्या आठ दराेडेखाेरांची ओळख पटली आहे. त्यातील तिघांना उपनगर पाेलीसांनी अलर्ट काॅल मिळताच पाठलाग करुन पकडले असून इतर पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. तिघांकडून गावठी कट्टा व दराेडा टाकण्यासाठी लागणारे घातक शस्त्रास्रे, दाेरी व मिरचीपूड जप्त केली आहे. त्यामुळे आता जबरी लूट व दराेड्याचे आणखी गुन्हे उघड हाेणार आहेत. अटकेतील सराईतांसह पळून गेलेले काही संशयित तडिपार व खंडणीखाेर आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं? समोर आली आकडेवारी

स्वप्निल उर्फ भूषण सुनिल गोसावी, दानिश हबीब शेख, बबलु रामधर यादव (वय २१, रा. सुंदरनगर), सागर म्हस्के, तुषार पाईकराव, सुरज भालेराव, अनिकेत उर्फ शबऱ्या देवरे, रोहीत लोंढे उर्फ भुऱ्या अशी संशयित दराेडेखाेरांची नावे असून गाेसावी, शेख व यादव यांना अटक करण्यात आली आहे. रोचनदास चोहितराम सचदेव (७०, रा. देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, ते शुक्रवारी (दि.२२) रात्री सव्वा नऊ वाजता देवळाली कँम्प भागातील भैरवनाथ मंदिरासमोरील दुकान बंद करून आयट्वेंटी कारमधून घरी जात होते. त्यावेळी दुसऱ्या आयट्वेंटी कारमधून आलेल आलेल्या वरील संशयितांनी कुरापत काढून थेट हातात हातोडी, गावठी कट्टा घेऊन सचदेव यांच्या वाहनाच्या (Vehicle) काचा फोडल्या.

हे देखील वाचा : Maharashtra News : राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड

तसेच कारमधील २५ हजार रुपयांची रोकड जबरीने लुटली. यात कारच्या काचा फुटल्याने सचदेव यांच्या हातास, चेहऱ्यास दुखापत झाली. यानंतर देवळाली कँम्प पाेलिसांत संशयितांवर जबरी लुटीचा गुन्हा नाेंदविण्यात आला. त्यानंतर या टाेळक्याचा शाेध सुरु असतानाच, त्यांनी उपनगर परिसरात दहशत माजविली. अवघ्या तासाभरात हेच संशयित रात्री साडेदहा वाजता देवळाली गावातील जाधव मळा परिसरात असलेल्या सुवर्ण साेयायटीत शिरले. त्यांनी आदित्य किशाेर आवारे व त्याचे मित्र कृष्णा साकला, संतोष पगारे व शुभम जाधव हे ऑफिसमध्ये गप्पा मारत असतानाच त्यांना नाहक शिवीगाळ करून कट्टा व हत्यारांचा धाक दाखवून आवारेच्या खिश्यातील पाच हजार रुपये काढून तिघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. ऑफिसच्या काचा व सीसीटीव्ही कॅमेरे फोडुन पळून गेले.

हे देखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीमधील सहा नेत्यांना लागणार विधान परिषदेची लॉटरी; कुणाला मिळणार संधी?

दरम्यान, याबाबत उपनगर पाेलिसांत (Upnagar Police) जबरी लूटीचा गुन्हा नाेंद आहे. पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये परिमंडळ दाेनच्या उपायुक्त माेनिका राऊत, सहायक आयुक्त डाॅ. सचिन बारी व उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या सूचनेने ही कारवाई सहायक निरीक्षक सुयाेग वायकर व पथकाने (Squad) केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा 

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...