Friday, May 1, 2026
HomeनाशिकNashik Crime : शर्माविरुद्ध उद्योजकांची एकजूट; चार दिवसांत तीन गुन्हे नोंद

Nashik Crime : शर्माविरुद्ध उद्योजकांची एकजूट; चार दिवसांत तीन गुन्हे नोंद

ग्रामीणमधील वसुलीबाजांचे 'उद्योग' रोखणार

नाशिक | Nashik

शहरातील अबड व सातपूर औद्योगिक वसाहतींत खासगी कंपन्यांचे ‘अतिक्रमण’ संदभनि माहितीचा अधिकार व तक्रारी नोंदवून उद्योजकांकडून खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात कथित समाजसेवक संतोष शर्मा (Santosh Sharma) याला अटक (Arrested) झाल्यावर त्याने हात जोडून ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिला’ घोषणा दिली आहे. विशेष म्हणजे शर्माचे अनेक ‘खंडणीकांड’ आता समोर येत आहेत. दोन्ही एमआयडीसीतील (MIDC) उद्योजकांनी त्याच्याविरोधात एकजूट दाखवून निडरपणे पोलिसांत तक्रारी नोंदवल्या आहेत.

- Advertisement -

त्यानुसार, मंगळवारी पुन्हा त्याच्यावर अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. कंपनी मालकांनी त्याला खंडणी (Extortion) दिली होती. त्यानंतर शर्मा गेल्या चार ते पाच वर्षांपासून संतोष शर्मा (रा. प्रियदर्शनी बंगलो, संसरी गाव, देवळाली कॅम्प) हा अनेक उद्योगांतील अतिक्रमण, जागा आणि तत्सम बाबींचे व्हिडीओ व फोटो काढून ‘एमआयडीसी’त तक्रारी नोंदवून उद्योजकांना आंदोलनाची तसेच माहिती अधिकार टाकण्याची धमकी देत होता. ‘नाहक त्रास नको’ म्हणून अनेक उद्योजक व शांतपणे आंदोलनासह उपोषणाला ‘मूठमाती’ देत होता.

अखेर शहर पोलिसांच्या (City Police) ‘कायद्याचा बालेकिल्ला’ मोहिमेमुळे कथित समाजसेवक शर्मा रडारवर आला. त्याच्याविरोधात उद्योजक संजय महाजन यांनी पहिली फिर्याद नोंदवली. त्यानुसार, पाचपैकी एक लाख रुपयांची खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात गुन्हेशाखा युनिट एकने त्याला देवळाली कॅम्पमधून गजाआड केले. हा गुन्हा दाखल झाला असताना त्याच्याविरोधात शैलेश अशोक भामरे व राजाराम बुधाजी पानसरे या दोन उद्योजकांनी फिर्यादी नोंदवल्या आहेत. त्यानुसार या गुन्ह्यांतही चुंचाळे पोलीस त्याचा ताबा घेणार आहेत.

कंपन्यांत वर्चस्व गाजवणारे रडारवर

अंबड, सातपूर, विंचूर, गोंदे, दिंडोरी, येवला, मालेगाव येथेही अनेक उद्योगधंदे आहेत. तेथे कथित समाजसेवक, स्थानिक राजकारणी, पदाधिकारी बेकायदेशिररित्या ‘युनियन’ लावून मुजोरी दाखवत आहेत. वरील ठिकाणीदेखील शर्मासारखे संशयित नानाविध कारणांनी खंडणी उकळून छळत आहेत, परंतु, भितीने कोणीही तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सर्वच खंडणीबहाद्दरांना इशारा दिला आहे. त्यानुसार शहर व ग्रामीण पोलीस सर्वच कथित व्यक्तींची झाडाझडती घेऊन तक्रार आल्यावर थेट गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे कंपन्यांत वर्षानुवर्षे ‘भाईगिरी’ करीत लुटमार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

तेव्हा आत्मदहनाचा प्रयत्न

सातपूर व अंबड एमआयडीसीतील १३० कारखान्यांतील अतिक्रमणांकडे एमआयडीसी अधिकारी कानाडोळा करीत आहेत. त्यांच्यांवर ‘निमा’ व ‘आयमा’ संघटनांचा दबाव असल्याचा आरोप करून संतोष शर्मा व त्याची पत्नी प्रिया हिने १ मे, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यानंतर संशयितांवर आवश्यक कायदेशीर कारवाई झाली होती. त्यानंतरही त्याने आपले उद्योग सुरुच ठेवले होते.

ठळक मुद्दे

  • शर्मा हा मूळचा परराज्यातील
  • संसरी गावात बसविला जम.
  • समाजसेवक संघटनेचा पदाधिकारी.
  • विधानसभा उपाध्यक्षांच्या व्हिडिओ कॉलनंतर सोडले होते उपोषण,
  • शर्माविरोधात तक्रारी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना ‘खो’

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा जनगणनेच्या कामासाठी बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने यंदा होणारी जि. प. कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याबाबत...