नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एका जमिनीचे (Land) खोटे साठेखत व सातबारा उताऱ्याच्या आधारे कुटुंबातील दोघा संशयितांनी त्रयस्ताशी हातमिळवणी करुन दावा न्यायप्रविष्ठ असतानाही दोन वकिलांच्या (Lawyers) मदतीने लोकअदालीत दाखल करुन त्यावर अवॉर्ड मिळवत मूळ जमीन मालकाची फसवणूक केली आहे. प्रकरणात फ्रॉड समोर आल्याने व दिशाभूल के ल्याचे उघड झाल्याने सरकारवाडा पोलिसांत तिघांवर गुन्हा (Case) नोंदविण्यात आला आहे.
बाळू रामनाथ इचाळे (वय ४०) व इंदुबाई रामनाथ इचाळे (वय ६०, दोघे रा. मु.पो. रासेगाव ता. दिंडोरी जि. नाशिक) आणि विशाल यशवंत वारूळे (वय ४२, रा. फुलेनगर, पेठरोड, पंचवटी) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत प्रभाकर माधव पाठक (रा. सिटीके अर हॉस्पिटलजवळ, पुणे रोड, द्वारका, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे. ७३ वर्षीय पाठक यांच्या फिर्यादीनुसार, संशयित बाळू आणि इंदुबाई यांनी विशाल वारुळे याच्याशी संगनमत करुन मार्च २०२३ ते ११ जानेवारी २०२४ या कालावधीत दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथील मालकी हक्क व कब्जेवहीवाटीतील १ एप्रिल २०२० चा खोटा साठेखत करारनामा आणि १६ नोव्हेंबर २०१९ च्या सातबारा उताऱ्याच्या आधारे दावा दाखल केला.
दरम्यान, हा दावा दाखल करताना अॅड. अमोल बलसाने व अॅड. आर. ए. बेजेकर यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायाधिश (वरिष्ठ स्तर १०) यांच्या न्यायालयात दावा २०२/२०२३ हा नोंदविला. त्यावर कार्यवाही सुरु असतानाच, वरील तिघांनी हा दावा संबंधित संशयित वकिलांच्या मदतीने थेट लोक अदालीत सुनावणीकामी ठेवला. त्यावर सुनावणी होऊन, प्रकरणात संशयितांना अवॉर्ड प्राप्त झाले. त्याआधारे पाठक यांच्या मालकीतील (Ownership) रासेगाव येथील गट नं. २५९ मधील २ हेक्टर २५ आर क्षेत्रापैकी ५६ आर शेतजमिनीपैकी १७ आर अर्थात अर्धा एकर क्षेत्र हडप करण्याचा प्रयत्न केला. ही बाब उघड झाल्याने अखेर गुन्हा नोंद झाला आहे.
मुद्दे
न्यायप्रविष्ठ दावा संशयास्पदरित्या लोकअदालतीत
तिघा संशयितांसह वकिलांची होणार सखोल चौकशी
आपल्या बाजूने निकालासाठी बनावट कागदपत्रांचा आधार
दाखल मूळ दाव्याचा निकाल प्रलंबित
वारुळेवर यापूर्वी गंभीर गुन्हे नोंद