Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमNashik Crime : वाजवी दरातील सहल भोवली; तिघांना सात लाख रुपयांचा गंडा

Nashik Crime : वाजवी दरातील सहल भोवली; तिघांना सात लाख रुपयांचा गंडा

कंपनीने गाशा गुंडाळला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंत्यंत वाजवी किमतीमध्ये परदेशात सहल आयोजित करण्याचे आमिष दाखवून शहरातील तिघांना सुमारे सात लाखांना गंडा घालण्यात आला आहे. मुंबई नाका पोलिसात (Mumbai Naka Police) याबाबत विस्तारोवा इंटरनॅशनल को ऑपरेटीव्ह सर्व्हिसेस प्रा.लि या कंपनीविरोधात गुन्हा (Case) दाखल झाला आहे.

- Advertisement -

शिल्पा वसंत जाधव (४२, रा. संगीत रेसीडेन्सी, गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार, फेब्रुवारी महिन्यात त्यांना विस्तारोवा कंपनीतून फोन आला आणि त्यांना तिडके कॉलनीतील कंपनीच्या कार्यालयात दाम्पत्यासह बोलाविले. त्यासाठी त्यांना कंपनीकडून भेटवस्तूही दिली जाणार होती. त्याप्रमाणे दाम्पत्य गेले असता, कंपनीचे संशयित संचालक सचिन माणिक सूर्यवंशी (रा. चौधरीनगर, लातूर), महेश प्रल्हाद कांबळे (रा. गोपी चाळ, मुंबई-पुणे रोड, पुणे), अविनाश खोपडे (रा. नाझरे,भोर, जि. पुणे), स्वप्निल देवधर कापडे (रा. प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी, पुणे), कमलेश शिंदे (रा. दापोडी, पुणे), धरम संगत (रा. थेरगाव, पुणे) यांनी आलेल्या अनेक दाम्पत्यांना कंपनीची माहिती दिली. तसेच, परदेशात अत्यंत वाजवी किमतीमध्ये सहलीची माहिती देत जाधव दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. कंपनीच्या या परदेशी सहलीची भूरळ पडल्याने जाधव दाम्पत्य यांच्याप्रमाणेच आणखी दोन दाम्पत्यांनी जागेवरच पैसे भरले.

YouTube video player

दरम्यान, कंपनीकडून रितसर कागदपत्रांसह सहलीबाबतची माहिती यशावकाश दिली जाणार होती. फेब्रुवारीत पैसे भरूनही कंपनीकडून (Company) कोणतीही माहिती मिळाली नाहीत. त्यामुळे पैसे भरलेल्या तिघांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. जुलैपर्यंत कंपनीचे कार्यालय होते आणि संपर्क होता. परंतु नंतर कंपनीचे तिडके कॉलनीतील कार्यालय बंद आणि संशयिताशी कोणताही संपर्क झाला नाही. यामुळे या तिघांची ६ लाख ९७ हजार ३०० रुपयांची फसवणूक (Fraud) झाली. उपनिरीक्षक शेख हे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...