Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : एमडी विक्रीत गुंतले पेंटर, रिक्षाचालक; युनिट एकची मानूर गावाजवळ...

Nashik Crime : एमडी विक्रीत गुंतले पेंटर, रिक्षाचालक; युनिट एकची मानूर गावाजवळ कारवाई

४२ हजारांचे ड्रग्ज हस्तगत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

छत्रपती संभाजीनगर रोडवरील मानूर गावाजवळ (Manur Village) एमडी विक्रीसाठी (MD Sell) आलेल्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने व अंमली पदार्थविरोधी पथकाने गजाआड केले आहे. दोघांकडून ४२ हजार ५०० रुपयांचे एमडी व दीड लाख रुपयांची रिक्षा, मोबाईल असा दोन लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी अवैध व्यवसाय, एमडी ड्रग्ज विक्री, तस्करी करणा-यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश एनडीपीएस पथकासह गुन्हे शाखा पथकांना दिले आहे. त्यानुसार शनिवारी (दि. १४) युनिट दोनशे पथक ड्रग्स पेडलरची माहिती संकलित करत होते. त्याचवेळी युनिट दोनचे सहाय्यक उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना रिक्षा क्रमांक (एमएच १५ एफयू ९२९२) मधून दोघे संशयित मानूर गावात ड्रग्स विक्रीसाठी येणार आल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती युनिट दोनचे प्रभारी हेमंत तोडकर यांना कळविली.

YouTube video player

गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी पथकास कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने सापळा रुचून संशयित पेडलर सुमित अशोक धाईंजे (वय २७, रा. हनुमंतनगर, उपनगर) व शाकीर हसन सय्यद (वय ३२, रा. विनस सोसायटी, बडाळागाव चौफुली) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी आढळून आले.

दरम्यान, पथकाने घटनास्थळी पंचनामा करून मुद्देमाल सील केला याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे, श्रेणी उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, नंदकुमार नांदुडर्डीकर, हवालदार प्रकाश बोडके अतुल पाटील आदींनी केली आहे. संशयितांचा ताबा आडगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...