Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik Crime : पत्नीनेच केली पतीची कुर्‍हाडीने हत्या; तब्बल दोन महिने शोषखड्ड्यात...

Nashik Crime : पत्नीनेच केली पतीची कुर्‍हाडीने हत्या; तब्बल दोन महिने शोषखड्ड्यात पुरून ठेवला मृतदेह

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

तालुक्यातील खुंटविहिर (Kunthvihir) जवळील मालगोंदा येथे पत्नीनेच पतीची कुर्‍हाडीने (Axe) निर्दयीपणे निर्घृण हत्या (Murder) करून तब्बल दोन महिने घरातील शौचालयाच्या शोषखड्ड्यात मृतदेह पुरुन ठेवले होते. त्यानंतर पतीच्या (Wife) नातेवाईकाने पत्नीकडे विचारणा केली असता तिच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले. यानंतर पोलिसांनी चक्रे फिरवून हा प्रकार उघडीस आणला.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, खुंटविहिर जवळील मालगोंदा (Malgonda) येथील मयत इसम यशवंत मोहन ठाकरे (४२) रा. मालगोंदा हा १४ एप्रिल २०२५ पासून घरातून मजूरी करीता गुजरात राज्यातील बिलीमोरा येथे गेला आहे असे आरोपी पत्नी प्रभा यशवंत ठाकरे (३८) हिने सासरे मोहन ठाकरे यांना सांगितले. त्यानंतर ती स्वतः मजूरी करीता बिलीमोरा येथे निघून गेली. घरच्यांनी यशवंतची नातेवाईकांकडे शोधा शोध सुरु केली. कामासाठी बाहेर गावी गेला असेल तर तो घरी परतणार या आशेने घरचे आई-वडील वाट बघत होते. पाऊस सुरु झाला तरी अद्याप यशवंत का घरी येत नाही. शिवाय त्याची पत्नी प्रभा ही पतीचा शोध का घेत नाही. सुमारे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेला यशवंत कामावरून घरी न परतल्याने संशयाची सुई प्रभाकडे अधिकच बळावली. घरात तपास केला असता घरातील ओसरीवर खड्डा खोदून शेण मातीने सारवलेले दिसून आल्याने मयताचे वडील मोहन ठाकरे यांना संशय आल्याने पोलीस ठाण्यात (Police Station) सूनेबाबत तक्रार दाखल केली.

YouTube video player

यानंतर पोलिसांनी बिलीमोरा येथून प्रभा हिस तपासणी करीता सुरगाणा येथील पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करीत महसूल विभागाला समवेत घेत घरातील ओसरीवरील खड्डा खोदकाम केले. मात्र, मृतदेह आढळून आला नाही. प्रभाने पोलिसांनां तपासात गुंगारा देत आरोप फेटाळून लावले. पोलिसांनी सोडल्याने बिनधास्तपणे ती फिरत होती. दोन दिवसांनी यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथी ही वीस ते पंचवीस दिवसापूर्वी दीर घरी आले का? असा तपास केला असता प्रभाने दारात असलेल्या यशवंतच्या चप्पला लपवत मांडीखाली ठेवत चप्पलावर बसून गप्पा मारल्या.  ही बाब मेथीच्या नजरेतून सुटली नाही. खड्डा खोदला असता काहीही धागा दोरा हाती न लागल्याने पोलिसांना (Police) रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मेथीने पती उत्तम यास ही सर्व हकिकत सांगत दक्षिणेस असलेला शौचालयाचा पडका शोषखड्डा आहे, त्यामध्ये तर नाही ना असा अंदाज व्यक्त करीत जाऊन बघून या असे सांगितले.

त्यानंतर उत्तमने संध्याकाळी जाऊन पाहीले असता त्या शोष खड्ड्यावर नीळ माशी पडत असून कुजलेल्या वस्तू सारखा वास येतोय असे लक्षात आले. त्यानंतर खड्यातील माती उकरून पाहीली असता मृतदेह असल्याचे आढळले. यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात येऊन चौकशी करीता मयताची पत्नी प्रभाला ताब्यात घेतले. यावेळी तिने मीच कुर्‍हाडीच्या फाशाने डोक्याच्या मागील भागात टोला मारल्याने तो मयत झाला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचनामा करत तब्बल घरातच शोषखड्ड्यात पुरुन ठेवलेला कुजलेला मृतदेह (Dead Body) बाहेर काढला असता केवळ हाडांचा सांगाडा उरला होता. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम परदेशी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. प्रभाने आपल्या पतीच्या शरीराचे मान,धड, हातपाय असे तीन तुकडे करून गोणीमध्ये भरून शोष खड्ड्यात टाकले होते. तसेच त्यावर वास येऊ नये म्हणून फॉरेट आणि औषधे टाकून माती, मुरुम, भाताची फोतरे, प्लास्टिक पिशव्या टकल्या होत्या.

दरम्यान, हे सर्व एकटी पत्नी (Wife) करु शकते का? कोणी मदत केली असावी का? आरोपी प्रभा हिचे माहेर डांग सीमावर्ती भागातील शिलोटमाळ येथे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजले नसून पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल मोरे, नायब तहसिलदार मोहन कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक आण्णा दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित खिरकाडे, संदीप पगारे, रमेश चव्हाण, मनोज चव्हाण, गणेश आव्हाड, लहूदास गायकवाड, रमेश महाले तसेच फॉरेन्सिक लॅब नाशिक करत आहेत. तर मारेकरी पत्नीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून तिला गजाआड केले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...