Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजDeola : विरोधकांकडून जनतेची दिशाभुल - खा. सुनिल तटकरे

Deola : विरोधकांकडून जनतेची दिशाभुल – खा. सुनिल तटकरे

देवळा । प्रतिनिधी Deola

राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून महिलांचा सन्मान केला आहे. रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी दीड कोटी महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये खात्यात जमा होतील. मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या निमित्ताने रक्षाबंधन भेट दिली जाणार आहे. विरोधकांकडून या योजनेसंदर्भात शंका घेत जनतेची दिशाभूल केली जात आहे ही योजना ही सलग पाच वर्षे सुरू राहील अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी दिली.

- Advertisement -

जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने देवळा येथे त्यांनी भेट दिली व पदाधिकारी व नागरिकांची संवाद साधला यावेळी ते बोलत होते. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर ,अनिल पाटील यावेळी उपस्थित होते. शिवस्मारकाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आदिवासी नृत्य सादर करणार्‍या विद्यार्थीनीचे कौतुक केले. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी लागणार्‍या आर्थिक स्वरूपाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली असून राज्यातील शेतकरी, शेतमजूर, पदवीच्या युवकांसाठी विशेष योजना आणल्या असून त्यांनाही रोजगाराच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत शासन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

देवळा नगरपंचायतीचे गटनेते संतोष शिंदे, जगदीश पवार, अश्विनी आहेर, मनोज गुजरे, मनोहर खैरनार, मनोज आहिरराव, स्वप्निल आहेर, अशोक सुराणा, अनिल आहेर, गोविंद सोनवणे, प्रेमांनद देवरे आदींसह महिला उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी तर सुत्रसंचालन गोरख निकम यांनी केले.

बाजारात वाहतूक कोंडी
दरम्यान रविवारी आठवडे बाजार असल्याने या भागात मोठी गर्दी झाली होती. जनसन्मान यात्रेनिमित्त नागरिकांनी हजेरी लावल्याने शहरातील पाच कंदिल परिसरात सर्व बाजूने सुमारे एक ते दीड किमी पर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या