Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमNashik Dindori Accident News : कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा करुण अंत;...

Nashik Dindori Accident News : कार विहिरीत कोसळून नऊ जणांचा करुण अंत; दुर्घटनेनंतर मंत्री झिरवाळांना स्थानिक घेराव घालत म्हणाले “या निष्पाप…”

नाशिक | Nashik

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) इंदोरे गावातील (Indore Village) दरगोडे कुटुंबातील ९ जणांचा ‘इर्टिका’ कारने घराकडे (House) परतत असताना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागातील विहिरीत कोसळल्याने मृत्यू (Death) झाला आहे. कार चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दरगोडे कुटुंब एका खाजगी क्लासच्या स्नेह संमेलनासाठी दिंडोरी शहरात आले होते. यावेळी कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वजण आपल्या ‘इर्टिका’ कारने (एमएच १५ जेएस १०५३) घराकडे परतत होते. त्यावेळी रात्री १० वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील राजू राजे यांच्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली. या घटनेनंतर आज (शनिवारी) सकाळी मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता संतप्त मृतांच्या नातेवाईकांनी त्यांना घेराव घालत “या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण?” असा सवाल केला.

हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे कुटुंबीयांवर काळाचा घाला

यावेळी झिरवाळ म्हणाले की, आजचा दिवस दिंडोरीसाठी ‘काळा दिवस’ आहे. एकाच कुटुंबातील नऊ माणसं जाणं ही अत्यंत गंभीर घटना आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावलं उचलली जातील. विहीर मालकाने घराला कंपाउंड केलं, मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? तसेच नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला, तिथे संरक्षण भिंत असणं गरजेचं होतं. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

तर मृतांच्या नातेवाईकांनी झिरवाळ यांच्यासमोर विहिरीला (Well) संरक्षण कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा याबाबत तक्रारींचा पाढा वाचत “जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर आज नऊ जणांचा जीव वाचला असता”, असे म्हटले. तसेच क्लास चालक आणि विहीर मालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील मृतांच्या नातेवाईकांनी केली.

मृतांची नावे

सुनील दत्तात्रय दरगोडे (वय ३२), रेशमा सुनील दरगोडे (वय २७), आशा अनिल दरगोडे (वय ३२), गुणवती सुनील दरगोडे (वय ११), श्रेयश अनिल दरगोडे (वय ११), श्रावणी अनिल दरगोडे (वय ११), सृष्टी अनिल दरगोडे (वय १४), समृद्धी राजेंद्र दरगोडे (वय ७) श्रद्धा अनिल दरगोडे (वय १३)

हे देखील वाचा : Breaking News : दिंडोरीत कार विहिरीत पडली; कार मध्ये शालेय विद्यार्थी असण्याची शक्यता; बचाव कार्य सुरु

ताज्या बातम्या

Nashik Trimbakeshwar Darshan Scam : मुक्काम कारागृहातच! कडलगांना सातव्या सुनावणीनंतरही दिलासा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांना व्हीआयपी दर्शनाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आणि मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम...