Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Dindori News : बस आणि कारचा अपघात; वाहनांनी घेतला पेट, दोघांचा...

Nashik Dindori News : बस आणि कारचा अपघात; वाहनांनी घेतला पेट, दोघांचा मृत्यू

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील अक्राळे फाट्याजवळ (Akrale Phata) राज्य परिवहन महामंडळाची बस आणि बलेनो कार (Bus and Baleno Car) या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात (Accident) होऊन बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. या अपघातात बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळत आहे. तर बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Rain News : रामकुंड परिसरातून २९ वर्षीय युवक पुराच्या पाण्यात गेला वाहून; आईने फोडला टाहो

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बलेनो कार ही नाशिककडे (Nashik) येत होती. तर राज्य परिवहन महामंडळाची बस कळवणकडे (Kalwan) जात होती. यावेळी अक्राळे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला. त्यामध्ये बसने पेट घेतल्याने बलेनो कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तर बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain News : पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दिंडोरीचे (Dindori) पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्यासह दिंडोरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आग (Fire) विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. बसचालक बलेनो कारला ओव्हरटेक करत असतांना हा अपघात झाल्याचे बोलले जात असून ही बस कळवण आगाराची असल्याचे समजते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...