नाशिक । प्रतिनिधी Nashik
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेमुळे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारला असून ही सभा तालुक्यातील वातावरण घड्याळमय करण्यास महत्त्वपूर्ण ठरली आहे. सर्व वातावरण घड्याळ्याच्या बाजूने झाले असून कार्यकर्त्यांनी आपल्याला ना. नरहरी झिरवाळ हा गरीब, मऊ, साधासरळच आमदार आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेत पाठावयाचा आंहे, असा चंग बांधला आहे.
दिंडोरी – पेठ विधानसभा मतदार संघात अगोदरपासूनच ना. नरहरी झिरवाळ यांचा जोर दिसून येत आहे. जिकडे जाऊ तिकडे जनता घड्याळालाच पसंती देतांना दिसत आहे. ‘झिरवाळ म्हणजे विकास, झिरवाळ म्हणजे हिरवळ’ अशीच भावना शेतकर्यांची झाली आहे. शेतकर्यांची एक क्रमांकाची मते नरहरी झिरवाळांना पडणार आहे. अजितदादांच्या सभेला उपस्थित असलेल्या शेतकरी वर्गांमधून दिसून आले. शेतकर्यांच्या कांदाच्या विषयाला हात घातल्याने शेतकरी वर्ग खुश झाला. त्याप्रमाणे शेतकर्यांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेला जिल्हा बँकेच्या विषयाला अजितदादा पवार यांनी हात घालून जिल्हा बँकेचे पुर्नरुजीवन करण्याचे आश्वासन अजितदादांनी दिल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड आनंद निर्माण झाला आहे.
झिरवाळांना निवडून दिल्यास जिल्हा बँक पुन्हा नव्या दमाने सुरु होईल, अशी चर्चा शेतकर्यांमध्ये चालू झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी सुध्दा खुश झाला आहे. अजितदादा पवार यांना खर्या अर्थाने महिलांच्या गर्दीने चांगला प्रतिसाद दिला. महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती.महिलांना लाडक्या बहिणी योजनेंचा फायदा झाल्याने सर्व महिला घड्याळाच मतदान करणार असल्याचे सांगत होत्या. सुमारे सव्वा लाख महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतला. त्याचा फायदा ना. झिरवाळ यांना मतदान रुपातून करुन देवू, असे महिलांनी सांगितले.
ना.अजितदादा पवार यांनी शरद पवारांच्या झिरवाळ यांच्या टिकेचा चांगलाच खरपुस शब्दात समाचार घेतला व शरद पवार यांनी आदिवासी म्हणून झिरवाळांना टोमणे मारल्याचे दिंडोरी – पेठ तालुक्यातील जनतेला निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सर्व मतदारांना झिरवाळांविषयी दया निर्माण झाली आहे. कुणी येतो अन बोलून जातो हे केवळ झिरवाळांच्या चांगल्या स्वभावामुळे आणि मऊ, गरीब स्वभावाचे असल्याचे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अजितदादा पवारांनी विधानसभा निवडणूकीत झिरवाळांना मतदान करायचे हे अप्रत्यक्ष रित्या टोला देवून सांगितले. झिरवाळांनी आदिवासी जनतेचा चेहरा म्हणून नाव कमावल्याचे दिसून आले. झिरवाळ यांच्यामुळेच सर्व आदिवासी व बहुजन समाजाला न्याय मिळाल्याचे स्पष्ट झाल्याने घड्याळाला दिंडोरी व पेठ मतदार संघातून प्रचंड आघाडी मिळेल, अशी चिन्हे निर्माण झाली आहे.
ना.अजितदादा पवार यांनी या सभेत माजी आमदार धनराज महाले यांना सुध्दा मोठेपणा देवून त्यांना पुर्नवसन करण्याचा शब्द दिला. धनराज महाले यांचे जुन्या व नव्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांना आनंद झाला असून शिवसैनिक सुध्दा घड्याळ्याच्या विजयासाठी त्वेसाने कामाला लागले आहे. झिरवाळांच्या विजयासाठी शिवसैनिक जीवाचे रान करीत आहे. अजितदादा पवार यांची सभा ही दिंडोरी – पेठ तालुक्याच्या इतिहासात प्रचंड विजय झिरवाळांना मिळवून देणारी ठरणार आहे. विरोधकांचा प्रचार आता भरकटलेला असून विरोधी गटात चिडचिड सुरु झाल्याचे मत अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा