Monday, May 6, 2024
HomeनाशिकNashik News : नाशिक विभागाला मद्यविक्रीतून मिळाला 'इतक्या' हजार काेटींचा महसूल

Nashik News : नाशिक विभागाला मद्यविक्रीतून मिळाला ‘इतक्या’ हजार काेटींचा महसूल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक विभागात (Nashik Division) मद्यविक्रीचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्याचे थेट परिमाण महसूलाच्या वाढीतून दिसून आले आहे. विशेष म्हणजे सन २०२३-२४ या कालावधीतील एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांत ४ हजार ४९८ काेटी रुपयांचा महसूल (Revenue ) नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागास (State Excise Department) मिळाला आहे. तर, मागील दाेन्ही वर्षांच्या महसुलात ५.६० टक्के तफावत आढळून आली आहे. यातून या विभागास एकूण महसूली लक्ष साध्य करण्यास अडचणी येत आहेत… 

- Advertisement -

सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवून देणाऱ्या विभागांपैकी एक राज्य उत्पादन शुल्क विभाग ओळखला जातो. या विभागाच्या नाशिक अधीक्षक कार्यालयाने एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या आर्थिक वर्षाच्या कालावधीत २३८ कोटींचा महसूल गत वर्षीच्या तुलनेने अतिरिक्तपणे जमवला आहे. त्यामुळे मद्यपींच्या (Alcoholic) जोरावर विभागाने शासकीय तिजोरीत भर टाकली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गतवर्षी एप्रिल २२ ते जानेवारी २३ या कालावधीत या विभागाने चार हजार २६० कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता.

तर चालू आर्थिक वर्षात याच कालावधीत चार हजार ४९८ कोटींचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीत २३८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्य निर्मिती, मद्यसेवन परवाना विक्री, इतर परवाने, कारवाई यातून महसूल गोळा करीत असतो. जिल्ह्यात देशी-विदेशी मद्यासह बीअर आणि वाइन विक्रीतूनही विभागाला आर्थिक उत्पन्न मिळत असते. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी एप्रिल, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि जानेवारी या महिन्यांत कमी महसूल मिळाला. मात्र, उर्वरित मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यांत चांगले उत्पन्न मिळाल्याने महसूलात वाढ झाली आहे. 

सर्वाधिक मद्य रिचवले

ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मद्यपींकडून देशी, विदेशीसह बिअर आणि वाईनला मागणी असल्याचे दिसून आले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सर्वाधिक २० लाख ४४ हजार ६२७ लिटर देशी मद्यविक्री झाले. तर नोव्हेंबर २०२३ मध्ये १३ लाख ४४ हजार १०५ लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. तसेच मे २०२३ मध्ये १६ लाख ८६ हजार ९७९ लिटर सर्वाधिक बिअर रिचवण्यात आली आहे. तर डिसेंबर २०२३ मध्ये ९२ हजार ५४४ लिटर वाईन मद्यपींनी रिचवली.

महिनानिहाय जमा महसूल (कोटी रुपयांत)

महिना – २०२२-२३ –   २०२३-३४

एप्रिल – ३२१.५६ –  ३१९.५९

मे – ३३०.७० – ४१७.८९

जून – ३५४.४५ – ४४३.७१

जुलै – ४४१.०० – ४६१.४०

ऑगस्ट – ३८२.५८ –   ४४०.६४

सप्टेंबर – ४६१.५३ –  ५४०.४१

ऑक्टोबर – ४५७.१९ – ४२७.६९

नोव्हेंबर – ५३९.३६ – ४९१.४३

डिसेंबर – ५६२.३५ –  ५७५.९८

जानेवारी – ४०९.३० – ३७९.८२

एकूण – ४,२६०.०१ – ४,४९८.५५

- Advertisment -

ताज्या बातम्या