नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagarparishad Election) आज (दि.२) रोजी सकाळी साडे सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९ टक्के मतदान झाले होते. यानंतर साडे अकरा वाजता यामध्ये वाढ होऊन ही आकडेवारी १७ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. तर दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१.४३ टक्के इतके मतदान झाले आहे. यात त्र्यंबकची (Trimbakeshwar) मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तर दुपारपर्यंत येवल्यात सर्वात कमी मतदान झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, बंदोबस्त वाढवला
सकाळी साडे नऊ वाजता त्र्यंबकमध्ये १३.३५ टक्के मतदान (Voting) झाले होते. तर साडे अकरा वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत ५१.२० टक्के मतदान झाले आहे. तर येवल्यात २०.९७ टक्के म्हणजे सर्वात कमी मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. तर पिंपळगाव बसवंत ४०.६५ टक्के, भगूर ३४.८६ टक्के, मनमाड २५.८४ टक्के, सिन्नर ३३.२५ टक्के, इगतपुरी ३३.४५, चांदवड ३६.५६ टक्के, ओझर २६.३१ टक्के, नांदगाव २५.३२ टक्के आणि सटाण्यात ४०.०२ टक्के इतके मतदान झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : साडे अकरा वाजेपर्यंत कुठल्या नगरपरिषदेत किती टक्के मतदान? आकडेवारी आली समोर
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७२ हजार ५४३ मतदारांपैकी दुपारी दीड वाजेपर्यंत १ लाख १७ हजार ०७६ मतदारांनी मतदान केले आहे. यात ५५ हजार १४४ महिला आणि ६५ हजार ४५३ पुरुष व इतर ०३ जणांचा समावेश आहे. या मतदानातून आज २६६ नगरसेवकपदांसाठी १,०२८ तसेच ११ नगराध्यक्षपदांसाठी ६१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.





