नाशिक | Nashik
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला,चांदवड, त्र्यंबक, सिन्नर, भगूर, ओझर, इगतपुरी, नांदगाव, मनमाड आणि सटाणा या ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी (Nagar Parishad Election) आज (दि.२) रोजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. दुपारी साडे तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात ४६.७१ टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ ही सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाचपर्यंत होती. परंतु, मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान चालणार असून, मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : मनमाडला भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांना धुतलं, मतदारांची पळापळ
ओझर येथे मतदानाची (Voting) मुदत संपल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. येथील नवीन इंग्रजी शाळेच्या मैदानावर सायंकाळी साडेचारच्या पुढे मतदारांची गर्दी झाल्यामुळे मतदान उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. तर नांदगाव येथील मतदान केंद्र क्रमांक नऊ आणि शिक्षण मंडळ गांधीनगर शाळा केंद्रावर चार नंतर मतदारांची मतदानासाठी गर्दी झाल्याने याठिकाणी मतदानाची वेळ वाढविण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : Nashik Election Update : त्र्यंबकला मतदान केंद्रावर राडा; पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची, बंदोबस्त वाढवला
तसेच येवल्यातील (Yeola) जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, एन्झोकेम हायस्कूल आणि स्वामी मुक्तानंद विद्यालय
येथील मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांच्या (Voters) मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी मतदान उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.





